मराठी बातम्या /बातम्या /देश /टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म, कमोडमध्येच डोक अडकलं; आईने मात्र....

टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म, कमोडमध्येच डोक अडकलं; आईने मात्र....

गुजरातमधील अहमदाबादमध्ये (Gujrat, Ahmedabad) एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये (Gujrat, Ahmedabad) एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये (Gujrat, Ahmedabad) एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली, 14 एप्रिल : गुजरातमधील अहमदाबादमध्ये (Gujrat, Ahmedabad) एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. मानसिकदृष्ट्या आजारी असणाऱ्या महिलेने (Mentally Ill Mother) टॉयलेटमध्येच एका बाळाला जन्म दिल्याची घटना घडली (Women Give Birth In Toilet Commode) आहे. यावेळी बाळाचं डोकं कमोडमध्ये अडकलं. या बाळाला बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेडची मदत घ्यावी (Fire Brigade Rescue Baby Girl) लागली.

महत्त्वाची बाब म्हणजे या परिस्थितीत जन्माला आलेलं बाळ पूर्णपणे सुरक्षित आहे. सध्या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. फायर ब्रिगेड अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना बाळाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बाळाला बाहेर काढण्यासाठी टॉयलेटच्या टाइल्स तोडण्यात आल्या. त्यानंतर पाण्याची पाईप लाइनही बंद करण्यात आली, जेणेकरुन कमोडमध्ये पाणी जाता कामा नये.

हे वाचा - शाळेची फी न भरल्याने शिक्षकाचं धक्कादायक कृत्य, मारहाणीत विद्यार्थीनीचा हात फ्रॅक्चर

नवजात चिमुकलीला अशा कठीण परिस्थितीतून बाहेर काढताना त्याला कोणतीही इजा होऊ नये, ते सुखरुप - सुरक्षित बाहेर यावं याचीही काळजी घेतली जात होती. बाळाला बाहेर काढताना पूर्ण सावधगिरीने काम करण्यात येत होतं. कमोड तोडल्यानंतर अतिशय सावधपणे बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर लगेच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता बाळ पूर्णपणे सुखरुप असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

First published:

Tags: Gujrat, Small baby