झारखंड, 09 जानेवारी : गरिबी ही माणसाला मिळालेला शाप आहे असं पूर्वीपासून म्हटलं जातं. पण समाज म्हणून आपलं कर्तव्य आहे की गरिबीला आळ घातला गेला पाहिजे. अशीच एक असंवेदनशील घटना नुकतीच समोर आली आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये एक मनोरुग्ण असलेल्या महिलेनं अन्न न मिळाल्यामुळे जिवंत कबुतराला ठार मारलं आणि नंतर त्याचे तुकडे तुकडे करून खाऊन टाकलं. मन्न हेलावून टाकणाऱ्या या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
रांची येथील राजेंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिम्स (RIMS) मध्ये ही घटना घडली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, RIMS हे शहरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी मोफत जेवण्याची व्यवस्था असते. परंतु, बेवारस रुग्णांची देखभाल करण्यासाठी कुणी नसतं. अशात रिम्समधील आर्थोपेडिक विभागाच्या परिसरात असे रुग्ण आश्रय घेतात.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, आर्थोपेडिक विभागाच्या परिसरात ही महिला दिवसभर लोकांना जेवण मागत होती. परंतु, तिला कुणीही अन्न दिलं नाही. दिवसभर उपाशी राहिलेल्या या महिलेनं अखेर आपल्या शेजारी आलेल्या एका कबुतराला पकडलं आणि ठार मारलं. त्यानंतर अर्धातास या महिलेनं कबुतराची पंख काढत होती. काही वेळानंतर या महिलेनं मेलेलं कबुतर खाऊन टाकलं.
ऑर्थोपेडिक विभागाच्या परिसरामध्ये अनेक अशा बेवारस रुग्णांनी आपलं ठाण मांडलं आहे. आपल्या जवळ कुणीच नसल्यामुळे हे रुग्ण तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे जेवण आणि पैसे मागत असतात. पण, याकडे रिम्स रुग्णालयाचे प्रशासन लक्ष्य देत नाही.
रिम्स हॉस्पिटलचे डीन डॉ. डीके सिंह यांनी सांगितलं की, 'लोकांची मदत करावी असा आमचा हेतू असतो. पण, असं असतानाही अशा रुग्णांची आम्ही मदत करू शकलो नाही. जे मानसिक रुग्ण असतात त्यांचा उपचार इथं होत नाही. त्यांना रिनपास इथं घेऊन जाण्यापेक्षा लोकं त्यांना रिम्स रुग्णालयाच्या परिसरात सोडून देतात. काही समाजसेवी संस्था अशा रुग्णांना योग्य त्या ठिकाणी नेऊन सोडत असतात.'
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.