Home /News /national /

याठिकाणी Oxygen Express यंत्रणा हाताळताना दिसली Women Power! रेल्वे मंत्र्यांनीही केलं कौतुक

याठिकाणी Oxygen Express यंत्रणा हाताळताना दिसली Women Power! रेल्वे मंत्र्यांनीही केलं कौतुक

टाटानगर (जमशेदपुर) येथून बंगळुरूत (Bengaluru) शुक्रवारी 7वी ऑक्सिजन एक्सप्रेस पोहोचली. विशेष म्हणजे या रेल्वेची सर्व यंत्रणा महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळली. या स्तुत्य प्रयत्नांची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली आहे.

कर्नाटक, 22 मे : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे (Second Wave) स्थिती गंभीर आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आता सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. मात्र या एकूण स्थितीमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा दूर व्हावा यासाठी विविध राज्यांचे प्रशासन आणि सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून रेल्वेच्या (Railway) माध्यमातून ऑक्सिजन (Oxygen) आणला जात आहे. यामुळे काही अंशी ऑक्सिजन तुटवडा कमी होण्यास मदत होत असून कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळत आहे. कर्नाटक राज्यात (Karnataka) देखील परिस्थिती काही वेगळी नाही. या राज्याला दररोज 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत असून, तशी मागणी राज्य सरकारने नोंदवली आहे. या पार्श्वभूमीवर टाटानगर (जमशेदपुर) येथून बंगळुरूत (Bengaluru) शुक्रवारी 7वी ऑक्सिजन एक्सप्रेस पोहोचली. विशेष म्हणजे या रेल्वेची सर्व यंत्रणा महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळली. या स्तुत्य प्रयत्नांची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल (Central Railway Minister Piyush Goyal) यांनी, ही रेल्वे महिला कर्मचाऱ्यांनी चालवल्याची माहिती दिली. एननडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी ऑक्सिजन ट्रेन जमशेदपूरहून बंगळुरूत दाखल झाली. या ट्रेनच्या माध्यमातून 120 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन (Medical Oxygen) आणण्यात आला असून, ही ट्रेन महिला कर्मचाऱ्यांनी चालवली (Womens Crew), अशी माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विट केलं. 7वी ऑक्सिजन एक्सप्रेस टाटानगर येथून (जमशेदपूर) बंगळुरूत दाखल झाली आहे. सर्व महिला कर्मचाऱ्यांमार्फत चालवण्यात आलेल्या या ऑक्सिजन ट्रेनमुळे राज्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा निरंतर पुरवठा करणं शक्य होणार असल्याचे मंत्री गोयल यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. कर्नाटक सरकारने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दररोज 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी नोंदवली आहे. शुक्रवारी कर्नाटकमध्ये 32,218 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आणि 353 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कर्नाटकात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 23.67 लाखांवर पोहोचली असून, 24,207 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

(वाचा - महिला डॉक्टरची माणुसकी; मरणाच्या दारात असलेल्या कोरोना रुग्णासाठी केलं भलं काम)

रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील जामनगर येथून 8वी ऑक्सिजन एक्सप्रेस (Oxygen Express) देखील बेंगळुरु येथे नुकतीच पोहोचली आहे. या एक्सप्रेसच्या माध्यमातून 109.2 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणण्यात आला आहे.
First published:

Tags: Coronavirus, Oxygen supply

पुढील बातम्या