Home /News /coronavirus-latest-news /

महिला डॉक्टरची माणुसकी; मरणाच्या दारात असलेल्या कोरोना रुग्णासाठी केलं भलं काम

महिला डॉक्टरची माणुसकी; मरणाच्या दारात असलेल्या कोरोना रुग्णासाठी केलं भलं काम

एका खासगी रुग्णालयात मरणाच्या दारात उभा असलेल्या एका मुस्लीम रुग्णासाठी (Corona Patient) हिंदू महिला डॉक्टरनं इस्लामिक प्रार्थना वाचली. डॉक्टरच्या या कामाचं सगळीकडे कौतुक होत आहे.

    तिरुअनंतपुरम 22 मे : कोरोना (Corona) संकटाच्या काळात डॉक्टर (Doctor) केवळ आपलं कर्तव्यच बजावत नाहीत, तर यापलीकडे जात रुग्णांना शक्य ती मदत करण्याचाही प्रयत्न करताना दिसतात. या संकटाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना वाचवण्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या डॉक्टरांचं आणि स्टाफचं जितकं कौतुक करावं, तितकं कमीच आहे. अशीच आणखी एक घटना आता केरळच्या (Kerala) पलक्कडमधील (Palakkad) पट्टांबीमधून समोर आली आहे. इथे एका खासगी रुग्णालयात मरणाच्या दारात उभा असलेल्या एका मुस्लीम रुग्णासाठी (Corona Patient) हिंदू महिला डॉक्टरनं इस्लामिक प्रार्थना वाचली. डॉक्टरच्या या कामाचं सगळीकडे कौतुक होत आहे. ही कोरोनाबाधित मुस्लीम महिला मागील दोन आठवड्यापासून व्हेंटिलेटरवर होती आणि तिच्या नातेवाईकांनी आयसीयूमध्ये जाण्यास परवानगी नव्हती. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, सेवाना हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर रेखा कृष्णा यांनी सांगितलं, की रुग्णाची प्रकृती खालावल्यानं त्यांना १७ मे रोजी व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं. नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली. मी त्यांच्या जवळ पोहोचले तेव्हा असं जाणवलं, की जगाचा निरोप घेण्यात त्यांना त्रास होत आहे. मग मी हळूहळू त्यांच्या कानामध्ये इस्लामिक प्रार्थना म्हटली. यानंतर त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि त्या स्तब्ध झाल्या. डॉ. कृष्णा यांनी सांगितलं, की मी असं काहीही करण्याचा विचार आधी केला नव्हता. हे एकदम अचानक घडलं. माझा जन्म दुबईत झाला आणि मी तिथेच लहानाची मोठी झाले. त्यामुळे मुस्लिमांच्या धार्मिक बाबींची काही प्रमाणात माहिती असल्यानं मी असं करू शकल्याचं त्यांनी सांगितलं. मी वेगळ्या धर्माची आहे म्हणून तिथे माझ्यासोबत कधीच भेदभाव नाही झाला आणि हाच सन्मान मी परत दिला आहे. डॉ. कृष्णा म्हणाल्या, की हे धार्मिक नाही तर माणुसकीचं काम होतं. कोरोना रुग्णांमधील सर्वात मूळ समस्या ही आहे, की ते स्वतःला एकटं आणि वेगळं समजतात. अशात आपण रुग्णांना मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करायला हवा. कृष्णा यांनी ही घटना आपल्या एका सहकाऱ्याला सांगितल्यानंतर त्यांनी ही सोशल मीडियावर शेअर केी. त्यांच्या या कामाचं सगळीकडेच कौतुक होत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona patient, Doctor contribution, Woman doctor

    पुढील बातम्या