Home /News /national /

Toolkit Case: दिशा रवीच्या अटकेप्रकरणी दिल्ली पोलिसांना महिला आयोगाची नोटीस; 3 दिवसांत मागितलं उत्तर

Toolkit Case: दिशा रवीच्या अटकेप्रकरणी दिल्ली पोलिसांना महिला आयोगाची नोटीस; 3 दिवसांत मागितलं उत्तर

22 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती दिशा रविच्या अटकेप्रकरणी (Disha Ravi Arrest) महिला आयोगाने (Women Commission) अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याप्रकरणी आयोगाने दिल्ली पोलिसांना (Delhi Police) नोटीस (Notice) पाठवली आहे.

  नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी: 22 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीच्या अटकेप्रकरणी (Disha Ravi Arrest) महिला आयोगाने (Women Commission) अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याप्रकरणी आयोगाने दिल्ली पोलिसांना (Delhi Police) नोटीस (Notice) पाठवली आहे. ज्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी अनेक आरोप केले आहेत. दिशा रवीच्या अटकेसंदर्भात कायद्याचं योग्य पालन केलं जात नसल्याचा आरोपही त्यांनी लावला आहे. दिल्ली पोलिसांनी शनिवारी दिशा रवीला बेंगळुरू येथून अटक केली आहे. तिच्यावर देशविरोधी कट रचण्याच्या आणि देशद्रोहाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नोटीसमध्ये काय म्हटलं आहे? दिल्ली पोलिसांना पाठवलेल्या नोटीसमध्ये महिला आयोगाने म्हटलं आहे की, 'विविध मीडिया रिपोर्टनुसार, दिशाला दिल्ली पोलिसांनी बेंगळुरू येथून 13 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांवर असा आरोप केला जात आहे की, दिल्ली पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर याची माहिती कोणालाही न देता, तिला बेंगळुरूवरुन दिल्लीला नेलं आहे. याची माहिती दिशा रविच्या पालकांनाही देण्यात आली नाही.'

  (वाचा - ट्वीटरसोबत वाद, केंद्र सरकार KOO Appला लवकरच माहितीचं प्रमुख माध्यम बनवणार-सुत्र)

  'ट्रान्झिट रिमांडसाठी स्थानिक न्यायालयासमोर हजर न करता तिला बेंगळुरूहून दिल्लीला नेण्यात आलं आहे, असा आरोपही नोटीशीत करण्यात आला आहे. शिवाय दिल्लीच्या न्यायालयात दिशा रवीला तिच्या वकिलाच्या अनुपस्थितीत हजर करण्यात आलं होतं, असंही माध्यमांच्या वृत्तांत म्हटलं आहे. महिला आयोगाने या प्रकरणात घटनेचा कलम 22(1) चा हवाला दिला आहे. त्याचबरोबर आयोगाने याप्रकरणी 19 फेब्रुवारीपर्यंतची माहिती दिल्ली पोलिसांकडे मागितली आहे.

  (वाचा - आरोपी महिलेने न्यायाधीशासोबतच जुळवलं सूत, आता जामिनावर लग्नही करणार!)

  कायद्याचं पालन केलं गेलं आहे- दिल्ली पोलीस दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी मंगळवारी सांगितलं की, पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला कायद्याचं पालन करत अटक करण्यात आली आहे. त्यांनी म्हटलं की, 22 वर्षीय असो वा 50 वर्षीय अशा कोणत्याच वयोगटासाठी कायदा भेदभाव करत नाही. दिशा रवीला सध्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Farmer protest, Greta Thunberg

  पुढील बातम्या