धमतरी, 10 एप्रिल : छत्तीसगढच्या धमतरी जिल्ह्यात एक अशी अनोखी प्रथा आहे, (Dhamtari District) जिच्याबद्दल तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्हाला त्याबाबत वाचून धक्का बसेल. धमतरी जिल्ह्यातील एका गावात महिलांना कपाळावर कुंकू लावण्याचीही मनाई तसेच ते कोणत्याच प्रकारचा श्रृंगार करू शकत नाही, याबाबतही त्यांच्यावर बंधन आहे. धक्कादायक परंपरा - या महिलांना खुर्चीवर बसणे, खाटीवर झोपणे, धान्य कापणे आणि झाडावर चढण्यासदेखील सक्त मनाई आहे. या अतिशय जुन्या आणि विचित्र नियमांमागील कारण म्हणजे गावकरी अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले आहेत. असे केल्याने देवी नाराज होते आणि गावात संकटं येतात, असा तर्क यामागे गावकरी लावतात. संदबाहरा (Sandbahra village) असे या गावाचे नाव आहे. येथील महिला या विचित्र नियमांचा सामना करत आहेत. हेही वाचा - …म्हणून राहुल गांधींनी 100 वेळा विचार करायला हवा, मायावतींचे जोरदार प्रत्युत्तर ही बंधने कोणी मोडली तर देवी कोपते आणि गावात आपत्ती येते, असे सांदबहरा गावातील ज्येष्ठ सांगतात. गावातील वडिलधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फार पूर्वी देवीने गावच्या प्रमुखाला स्वप्नात असा आदेश दिला होता. तेव्हापासून हे गाव भिकारीच राहिले आहे. श्रृंगारविना महिलेची कल्पना केली जाऊ शकत नाही. कुंकू लावणे महिला श्रृंगारचा अविभाज्य घटक आहे. मात्र, या गावात महिलांना कुंकू लावण्यास परवानगी नाही. काही विवाहित महिलांनी सांगितले की, त्यांना स्वत:ला सजवायचे आहे. खुर्चीवर बसायचे आहे, पलंगावर झोपायचं आहे. मात्र, काही वाईट होण्याच्या भीतीमुळे त्यांना त्यांचे मन मारु जगावे लागत आहे.
तरी परंपरा मोडू शकत नाही -
अशा परिस्थितीतही काही महिलांनी या नियमांविरोधात आवाज उठवला होता. रेवती मरकाम नावाच्या महिलेने सांगितले की, त्यांनी लोकांना समझावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या यात यशस्वी होऊ शकल्या नाही. लोकांचा दबाव इतका जास्त आहे की, महिलांची इच्छा असूनही त्या या बंधनांपासून मुक्त होऊ शकत नाही. गावात आता काही जण शिक्षित होत आहेत तसेच आधुनिक जगासोबत जुळण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यांसारख्या अंधविश्वासापासून मुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात जगजागृती करण्याची गरज आहे.