नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : साडी हा काही ‘स्मार्ट विअर’ नसल्याचं (Restaurant rejects entry to a woman saying Saree in not allowed inside) सांगत एका महिलेला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील एका रेस्टॉरंटनं ड्रेस कोडचं कारण (Saree not smart wear says Restaurant) पुढे करत साडी नेसणाऱ्या महिलांना प्रवेश देण्यास नकार दिल्याचं समोर आलं आहे. एक महिला साडी नेसून या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करत होती. मात्र तिला गेटपाशीच रोखण्यात आलं आणि परत जायला सांगण्यात आलं. ड्रेस कोडची अजब सक्ती दिल्लीतील एका अक्वीला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या महिलेला केवळ या कारणासाठी बाहेर थांबवण्यात आलं की तिने साडी नेसली होती. आमच्या रेस्टॉरंटमध्ये केवळ ‘स्मार्ट विअर’ घालून यायलाच परवानगी असून साडी नेसलेल्या महिलांना आम्ही प्रवेश देऊ इच्छित नाही, असं या रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी तिला सांगितलं. त्यावर तिने त्यांना जाब विचारला आणि मोबाईलचा कॅमेरा सुरू केला.
Saree is not allowed in Aquila restaurant as Indian Saree is now not an smart outfit.What is the concrete definition of Smart outfit plz tell me @AmitShah @HardeepSPuri @CPDelhi @NCWIndia
— Anita Choudaary (@choudaary_anita) September 20, 2021
Please define smart outfit so I will stop wearing saree @PMishra_Journo #lovesaree pic.twitter.com/c9nsXNJOAO
व्हिडिओ क्लिप व्हायरल तुम्ही मला जो नियम सांगता आहात, तो पुन्हा सांगा, असं तिनं मोबाईलचा कॅमेरा सुरू करून सांगितलं. त्यावर तिथल्या एका महिला कर्मचाऱ्यानं आपल्या रेस्टॉरंटमध्ये केवळ स्मार्ट विअरलाच परवानगी असल्याचं सांगितलं. 16 सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटिझन्सची रेस्टॉरंटच्या या प्रकाराचा निषेध केला असून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे वाचा - अल्पवयीन मुलाने केली आई, वडील, बहीण आणि कुत्र्यांचीही हत्या नेटिझन्सकडून टीका साडी हा स्मार्ट पोशाख आहे की नाही, हे कोण ठरवणार, असा सवाल लेखिका शेफाली वैद्य यांनी उपस्थित केला. आपण अमेरिका, युएईसह जगातील अनेक देशांत रेस्टॉरंटमध्ये जाताना साडी नेसली होती. मात्र आपल्याला कधीच अटकाव करण्यात आला नाही. दिल्लीतील रेस्टॉरंटवाले असे नियम कुठल्या आधारावर करत आहेत, असा सवाल त्यांनी केला आहे. पत्रकार अनिता चौधरी यांनी गृहमंत्री आणि दिल्ली पोलिसांना टॅग करत रेस्टॉरंटच्या या वर्तणुकीबाबत सवाल उपस्थित केला आहे. आपल्याला कुणी तरी स्मार्ट विअरची व्याख्या सांगावी म्हणजे आपण साडी नेसणं बंद करू, असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला आहे.