औरंगाबाद, 24 जून: श्रद्धाळू महिला किंवा अल्पवयीन तरुणींना कर्मकांडात गुंतवून मांत्रिकानं त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. संबंधित आरोपींवर पोलिसांनी वेळोवेळी कडक कारवाई देखील केली आहे. पण औरंगाबाद याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. मांत्रिकानं स्वप्नात येऊन आपल्यावर वारंवार बलात्कार (Charmer raped woman in dream) केल्याचा आरोप एका महिलेनं केला आहे. याप्रकरणी तिने पोलिसांत जाऊन संबंधित मांत्रिकाविरोधात गुन्हा देखील (FIR Lodged) दाखल केला आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तथाकथित आरोपी मांत्रिकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी देखील केली आहे. पण कोणताही पुरावा नसल्यानं पोलिसांनी मांत्रिकाला सोडून दिलं आहे. संबंधित घटना बिहारच्या औरंगाबाद येथील आहे. फिर्यादी महिलेनं तक्रारीत म्हटल्यानुसार, काही दिवसांपूर्वी फिर्यादीच्या मुलाची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यामुळे फिर्यादीनं प्रशांत चतुर्वेदी नावाच्या एका मांत्रिकाकडून मुलावर उपचार करून घेतले होते. तसेच मुलगा ठणठणीत व्हावा म्हणून घरात पूजा देखील केली होती.
परंतु पूजा केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांतच फिर्यादीच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आपल्या मुलाचा मृत्यू कसा झाला? याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी महिला मांत्रिकाच्या घरी गेली. यावेळी मांत्रिकानं तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपल्या मुलानं मांत्रिकापासून आपल्याला वाचवलं असा दावाही महिलेनं पोलीस तक्रारीत केला आहे.
हेही वाचा-एका रात्रीसाठी साडेचार लाखांत सौदा; 16 वर्षाच्या भाचीला विकणाऱ्या बारबालाला अटक
सामनानं दिलेल्या वृत्तानुसार तथाकथित आरोपी मांत्रिकानं फिर्यादी महिलेच्या स्वप्नात येऊन वारंवार बलात्कार केला आहे. याप्रकरणी महिलेनं पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी मांत्रिकाला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी देखील केली आहे. पण फिर्यादी महिलेला आपण कधी भेटलोच नसल्याचं स्पष्टीकरण मांत्रिकानं दिलं आहे. मांत्रिक चतुर्वेदी विरोधात कसलाही पुरावा नसल्यानं पोलिसांनी त्याला सोडून दिलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime news, Rape