हैदराबाद, 19 सप्टेंबर : हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये एका महिलेला एक्सएल इमर्जेंसी सीटवरुन हटण्यास सांगण्यात आलं. त्याच्यासोबत असलेल्या एका प्रवाशाने ट्विटरवर ही घटना ट्विटरवर शेअर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंदी आणि इंग्रजी बोलता येत नसल्याने सुरक्षेच्या कारणाचा हवाला देत महिलेचं सीट बदलण्यात आलं. या प्रकरणात तेलंगणाचे मंत्री केटी रामारावने ट्विट करून संताप व्यक्त केला.
विजयवाडाहून हैद्राबादला जाणाऱ्या फ्लाइटमधील एक प्रवाशी देवस्मिता चक्रवर्तीने ट्विट करून सांगितलं की, कशा प्रकारे महिलेला तिची सीट बदलण्यास सांगण्यात आलं. या महिलेला केवळ तेलुगू भाषा येत होती. ही घटना 16 सप्टेंबरची आहे.
देवस्मिता यांनी महिलेचा फोटो शेअर करीत #Discrimination ट्विटमध्ये लिहिलं की, हिरव्या रंगाची साडी नेसलेल्या या महिलेला तिच्या मूळ सीटवरुन 2A (XL सीट, एग्जिट रो) उठवलं आणि 3 सी मध्ये बसवण्यात आलं. कारण ती केवळ तेलुगू बोलू शकत होती. तिला हिंदी आणि इंग्रजी येत नव्हतं. फ्लाइट अटेंडेटने सांगितलं की, सुरक्षेच्या कारणास्तव असं करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेश ते तेलंगानापर्यंत फ्लाइटमध्ये तेलुगूमध्ये दिशा-निर्देश नाहीत.
देवस्मिता यांच्या पोस्टने अनेकांचं लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यांनी ही घटना म्हणजे भेदभाव असल्याचं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तेलंगणाचे आयटी मंत्री केटी रामाराव यांनी इंडिगो मॅनेजमेंटकडे स्थानिक भाषांचा सन्मान करण्याचा आग्रह केला. त्यांनी ट्विट केलं की, 'रीजनल मार्गावर इंडिगोला स्थानिय भाषा उदा.. तेलुगू, तमिल, कन्नड भाषा येत असलेला स्टाफ भरती करणं गरजेचं आहे. यातूनही हा प्रश्न सुरू शकेल.
आपल्या स्पष्टीकरणात इंडिगोने सांगितलं की, ही एक सर्वसमावेशक संघटना आहे. आम्ही विविध भागातील वैविध्याचा सन्मान करतो. सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, एग्झिट डोरवर बसलेल्या प्रवाशाला तातडीने बाहेर जाण्यास सूचना दिली जाते. त्यामुळे त्याने भाषा समजणं गरजेचं आहे. अशा आपात्कालीन परिस्थितीत त्याने क्रूर मेंबर्सला सहकार्य करणं अपेक्षित आहे.
त्याच विमानात प्रवास करणाऱ्या डीएलआर प्रसादने सांगितलं की, ती महिला घाबरली होती. या सर्व प्रकारानंतर तिने याबाबत सांगितलं. क्रूपैकी कोणालाच तेलुगू भाषा येत नव्हती, त्यामुळे त्यांना शिफ्ट व्हावं लागलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Domestic flight, Tamil nadu