जयपूर 18 एप्रिल : रुग्णवाहिका
(Ambulance) न मिळाल्यानं पतीला गमावलेल्या महिलेनं गावाला रुग्णवाहिका दान केली आहे. जेणेकरून गावात कुणालाही रुग्णवाहिकेअभावी जीव गमवावा लागू नये. या महिलेनं पेन्शन आणि इतर पैशांची बचत करून रुग्णवाहिका खरेदी केली आहे. धर्मादेवी असं या महिलेचं नाव असून त्या राजस्थानच्या फतेहपूर शेखावटीमध्ये राहतात. या महिलेच्या दानशूरपणाचं लोक भरभरून कौतुक करत आहेत.
झालं असं की, नीमकाथाना येथील रहिवासी धर्मादेवी यांचे पती सेवानिवृत्त सुभेदार यांना चार वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका
(Heart Attack) आला होता. रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांना वेळेत रुग्णालयात पोहोचवता आले नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून या महिलेने पैसे गोळा करण्यास सुरुवात केली आणि आता 10 लाख रुपयांची रुग्णवाहिका
(Ambulance) खरेदी करून ती गावातील रुग्णालयाला सुपूर्द केली. रुग्णवाहिका नसल्यामुळे कोणालाही जीव गमवावा लागू नये, हा त्यामागचा हेतू आहे.
6 जणं 13 दिवस निर्जन ठिकाणी अडकले, एका बाटलीने केला चमत्कार अन् नौदलानं वाचवलं
धर्मा देवी यांचा मुलगा आणि सरपंच शेर सिंह तन्वर यांनी सांगितलं की, त्यांचे वडील रावत सिंह तन्वर यांना चार वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. रात्र असल्यामुळे रुग्णवाहिका किंवा कार सापडली नाही. त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यांच्या वडिलांना वाचवता आले नाही. तेव्हापासून आई धर्मादेवी आणि भावांनी गावासाठी रुग्णवाहिका खरेदी करणार असल्याची शपथ घेतली होती. त्यानुसार गेल्या चार वर्षांपासून ते पैसे गोळा करत होते. अखेर त्यांनी 10 लाख रुपयांची रुग्णवाहिका खरेदी केली आणि गावच्या रुग्णालयाकडे गावकऱ्यांच्या सोयीसाठी सुपूर्द केली.
गावामध्ये मोठे रुग्णालय नसल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना नीमकाथाना किंवा जयपूरला (Jaipur) न्यावं लागतं. डोंगराळ भाग असल्याने नीमकाथाना येथून रुग्णवाहिका येण्यास वेळ लागतो. त्यामुळे रुग्ण वेळेत पोहोचण्याची शक्यता कमी असते, परिणामी त्यांना जीव गमवावा लागतो. परंतु आता रुग्णवाहिका उपलब्ध असल्यामुळे गरजूंना रुग्णवाहिका सहज मिळू शकते.
ही आहे भारताची खास पाणबुडी INS वागशीर, जाणून घ्या हिच्या वैशिष्ट्यांबद्दल
रुग्णवाहिका चालवण्याचा संपूर्ण खर्चदेखील धर्मादेवी देतील. डिझेल, चालकाचा पगार आणि रुग्णवाहिकेच्या दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च सर्व त्याच देणार आहेत. रुग्णांकडून कोणतेही पैसे आकारले जाणार नाही. रुग्णवाहिका हवी असेल, तर त्यासाठी कॉल करण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांकदेखील जारी केला जाईल, एका फोनवर रुग्णवाहिका गरजूंच्या दारात उपलब्ध असेल. ही रुग्णवाहिका व्हेंटिलेटर
(Ventilator), ऑक्सिजन सिलेंडर
(Oxygen Cylinder) यांसारख्या आवश्यक उपकरणांनी सुसज्ज आहे.
रुग्णवाहिकेअभावी पतीला गमावणाऱ्या धर्मादेवी यांनी गावात दिलेली भेट खरंच अनमोल आहे. त्यांच्या या मदतीमुळे गावातील अनेकांना मदत होईल. रुग्ण वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकतील, त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.