जाहिरात
मराठी बातम्या / देश / पती वेगळा राहतो म्हणून पत्नी उचलत होती टोकाचं पाऊल; वेळेवर धावून आले पोलीस अन्...

पती वेगळा राहतो म्हणून पत्नी उचलत होती टोकाचं पाऊल; वेळेवर धावून आले पोलीस अन्...

पती वेगळा राहतो म्हणून पत्नी उचलत होती टोकाचं पाऊल; वेळेवर धावून आले पोलीस अन्...

दिल्ली येथे एक महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच प्रयत्न करत तिला वाचविले आहे आणि याप्रकारे तिचा जीव वाचला. (woman attempt to suicide) ही महिला 30 वर्षांची आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 एप्रिल : येथे एक महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच प्रयत्न करत तिला वाचविले आहे आणि याप्रकारे तिचा जीव वाचला. (woman attempt to suicide) ही महिला 30 वर्षांची आहे. दक्षिण दिल्लीतील आर. के. पुरम परिसरात ही घटना घडली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस उपायुक्त (दक्षिण पश्चिम) मनोज सी. यांनी सांगितले की, सात एप्रिलला सहाय्यक उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल धरम राज ड्युटीवर होते. याचदरम्यान, पीसीआर वर फोन आला की, एका महिलेने आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले की, जेव्हा टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांना ती महिला एका खोलीत बंद दिसली, जी कथितपणे दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. ही घटना जेव्हा घडली तेव्हा तिचा पती ऑफिसमध्ये होता.   KL राहुल पहिल्याच बॉलवर क्लिन बोल्ड होताच गर्लफ्रेंड आथियाची अशी होती रिअ‍ॅक्शन पुलिस उपायुक्त म्हणाले की, आमच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला तसेच तिला आत्महत्या करण्यापासून वाचविले. यामुळे वेळेतच त्या महिलेचा जीव वाचवण्यात आला. यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यात आणले. तसेच तिचे समुपदेशन करण्यात आले. समुपदेशन करताना आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेने खुलासा केला की, तिचा पती आणि तिच्यामध्ये बोलणे होत नाही. तसेच तो तिच्यापासून वेगळा राहतो, हेदेखील तिने यावेळी सांगितले. पोलीस उपायुक्त यांनी पुढे सांगितले की, याबाबत महिला पोलीस कर्मचाऱ्याने माहिती दिली की,  ती महिला तीव्र नैराश्याने ग्रस्त आहे. तसेच तिच्या पतीलाही बोलवण्यात आले. दोघांचे समुपदेशन करण्यात आल्याचेही पोलीस उपायुक्तांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात