Home /News /national /

नवऱ्याबरोबच्या भांडणात जीवाचाही विचार केला नाही, 8 महिन्याच्या चिमुरडीसह दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी

नवऱ्याबरोबच्या भांडणात जीवाचाही विचार केला नाही, 8 महिन्याच्या चिमुरडीसह दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी

22 वर्षीय महिलेनं तिच्या 8 महिन्याच्या चिमुरडीसह इमारतीतून उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुसऱ्या मजल्यावरून महिलेनं असा प्रकार केल्याने स्थानिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

    हैदराबाद, 03 जानेवारी: एका महिलेनं तिच्या 8 महिन्याच्या चिमुरडीसह इमारतीतून उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हैदराबादमधील (Hyderabad) जुबिली हिल्स (Jubilee Hills) याठिकाणी असणाऱ्या एका इमारतीमध्ये ही घटना घडली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून तिच्या बाळासह या 22 वर्षीय महिलेनं उडी घेतली, त्यामुळे स्थानिकांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता. मीडिया अहवालांनुसार सब इन्स्पेक्टर कन्नेबोइना उदय यांनी दिलेल्या माहितीनुसार बिमल कुमार हा इसम बिहारमधून हैदराबादमध्ये काही वर्षांपूर्वी वास्तव्यास आला होता. या जोडप्यामध्ये कधीकधी कुरबूर-भांडण होत असल्याचीही माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री जेव्हा हा प्रकार घडला त्यावेळी देखील दोघांमध्ये काहीसं भांडण झालं. थोड्याच वेळात या भांडणाने वेगळं वळण घेतलं, आणि रागाच्या भरात आरतीने तिच्या मुलीसह इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. आरती आणि बिमल यांची चिमुरडी अवघ्या 8 वर्षांची आहे. (हे वाचा-एक नव्हे 16 तरुणांना ओढले जाळ्यात, तरुणीकडे सापडले 1 कोटींपेक्षा जास्तीचे गिफ्ट) स्थानिकांनीच त्या दोघींनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. यामध्ये आरतीला मृत घोषित करण्यात आलं असून चिमुरडीचा जीव वाचला आहे. असं असलं तरीही तिची देखील परिस्थिती गंभीर आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, त्यांनी अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Hyderabad, Suicide

    पुढील बातम्या