नवी दिल्ली, 11 एप्रिल : एखाद्याला पाहून डोळा मारणं (Winking) किंवा फ्लाईंग किस (Flying Kisses) करणं हेदेखील लैंगिक छळ केल्याच्या श्रेणीत येतं. पॉक्सो कोर्टने (Pocso Court) असं करणाऱ्या एका आरोपी 20 वर्षीय युवकाला एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसंच त्याला 15000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. कोर्टाने आपल्या निर्णयात सांगितलं की, आरोपी युवकाने अल्पवयीन मुलीला पाहून डोळा मारणं आणि फ्लाईंग किस करण्याचं कृत्य केलं होतं, जे लैंगिक छळ (Sexual Harassment) मानलं जाऊ शकतं. कोर्टाने आरोपीला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, त्यापैकी 10 हजार रुपये पीडित पक्षाला दिले जाणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 14 वर्षीय पीडित मुलीने कोर्टात 29 फेब्रुवारी रोजी ती आपल्या बहिणीसोबत कुठे जात असताना, शेजारी राहणाऱ्या आरोपीने (Accused) तिला पाहून डोळा मारला आणि तिला फ्लाईंग किस केलं. आरोपीने याआधीही अशाप्रकारचं कृत्य अनेकदा केलं होतं. त्याला समजवल्यानंतरही तो तसंच वागत होता. त्या मुलीने या प्रकाराबाबत तिच्या आईला सांगितलं होतं. अनेकदा त्याला अशा वागणूकीबद्दल समजवण्यात आलं, परंतु त्याच्या वागण्यात कोणताही बदल न झाल्याने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. बचाव पक्षाचे युक्तीवाद कोर्टाने नाकारले - या प्रकरणी सुनावणीवेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी, त्या मुलीने आणि तिच्या आईने केलेले आरोप लैंगिक छळ म्हणून पाहू नये, तसंच वकिलांनी असाही आरोप केला की, पोलिसांनी या प्रकरणी योग्य तपास केला नाही. परंतु कोर्टाने बचाव पक्षाच्या युक्तीवादाकडे दुर्लक्ष केलं. कोर्टाने आपल्या निर्णयात सांगितलं की, असं कोणतंही कारण दिसत नाही, ज्यामुळे पीडितेने लावलेले आरोप चुकीचे आहेत, हे स्पष्ट होऊ शकेल. परंतु असे अनेक पुरावे आहेत की आरोपीला बऱ्याचदा अशा प्रकारच्या कृत्यापासून परावृत्त करण्यात आलं. कोर्टाने, एखाद्याला डोळा मारणं किंवा फ्लाईंग किस करणं हे छळ करण्याच्या श्रेणीत येत असल्याचं सांगितलं. बचाव पक्षाने असाही आरोप केला की, पीडितेची चुलत बहिण आणि आरोपीमध्ये 500 रुपयांची बेट लागली होती. त्या बेट मुळेच आरोपीने डोळा मारला. परंतु पीडित मुलीने कोर्टात हा आरोप फेटाळला आहे. तिने बेट लागल्याची बाब पूर्णपणे चुकीची असल्याचं सांगितलं. आरोपी युवक सतत अशाप्रकारचं कृत्य करत होता. बचाव पक्षाने कोर्टात अनेकदा पीडिता आणि तिच्या आईचे आरोप खोटे असल्याचं कोर्टात वारंवार सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोर्टाने पीडित मुलीच्या बाजूने निकाल दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.