नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाशी सुरू असलेल्या हवाई चकमकीवेळी पाकिस्तानचं F-16 लढाऊ विमान पाडण्याचं शौर्य गाजवणारे तत्कालीन विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांना आज (22 नोव्हेंबर) खास सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या हस्ते वीरचक्र (Veerchakra) हा सन्मान प्रदान करण्यात आलं. अन्य काही वीर जवानांनाही या वेळी गौरवलं गेलं.
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय आणि पाकिस्तानी हवाई दलांमध्ये चकमक सुरू होती. त्या वेळी 27 फेब्रुवारी 2019 रोजी तत्कालीन विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पराक्रम गाजवून पाकिस्तानी हवाई दलाचं एफ-16 (F-16) हे लढाऊ विमान पाडलं. त्यानंतर त्यांच्या मिग-21 (Mig-21) विमानावर पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. तेव्हा त्यांनी पॅराशूटच्या साह्याने विमानातून उडी घेतली होती आणि ते पाकव्याप्त काश्मिरात उतरले होते. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेतलं होतं. भारताने पाकिस्तानवर राजनैतिक दबाव वाढवल्यानंतर पाकिस्तानला त्यांची सुटका करावी लागली.
Delhi: Wing Commander (now Group Captain) Abhinandan Varthaman being accorded the Vir Chakra by President Ram Nath Kovind, for shooting down a Pakistani F-16 fighter aircraft during aerial combat on February 27, 2019. pic.twitter.com/CsDC0cYqds
— ANI (@ANI) November 22, 2021
Indian Army Recruitment 2021: विना परीक्षा लष्कर अधिकारी होऊन देशसेवेचे संधी
अभिनंदन वर्धमान यांच्या या शौर्याचा गौरव करण्यासाठी त्यांना वीरचक्र हा सन्मान देण्यात आला आहे. त्यावेळी संपूर्ण देशभरात अभिनंदन यांच्या नावाचा जयघोष सुरु होता. तसेच, त्यांच्यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकारे मिशा ठेवण्याची फॅशनही ट्रेंड झाली होती. अलीकडेच, म्हणजे 3 नोव्हेंबर 2021 रोजी अभिनंदन यांना ग्रुप कॅप्टन (Group Captain) रँकवर बढती देण्यात आली. त्यांना आज (22 नोव्हेंबर) राष्ट्रपतींच्या हस्ते वीरचक्र सन्मान प्रदान केला आहे.
याच कार्यक्रमात भारतीय हवाई दलातले हुतात्मा सॅपर प्रकाश जाधव (Sappr Prakash Jadhav) यांना कीर्तिचक्र (Keertichakra) सन्मानाने मरणोत्तर गौरवलं गेलं आहे. जम्मू-काश्मिरातल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या मोहिमेतल्या त्यांच्या शौर्याबद्दल त्यांचा हा गौरव केला आहे. कीर्तिचक्र हा शांतता काळातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च गॅलंट्री पुरस्कार आहे.
Varun Gandhi लवकरच BJP ला करणार रामराम? 'या' पक्षात प्रवेश करणार प्रवेश
मेजर विभूतिशंकर धौंडियाल (Major Vibhutishankar Dhoundiyal) यांनाही शौर्यचक्र सन्मान मरणोत्तर प्रदान केला आहे. त्यांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. जम्मू-काश्मिरात सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत A++ कॅटेगरीतल्या दहशतवाद्याला ठार केल्याबद्दल नायब सुभेदार सोमबीर यांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं आहे.
माजी इस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त), इंजिनीअर इन चीफ ले. जन. हरपालसिंग, सदर्न नेव्ही कमांडर व्हाइस अॅडमिरल अनिल चावला यांना परम विशिष्ट सेवा पदक दिलं आहे. तसेच, इस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल दिलीप पटनाईक यांना अतिविशिष्ट सेवा मेडल प्रदान केलं गेलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.