Home /News /national /

पत्नी कुणाशीतरी फोनवर बोलत होती, दारूच्या नशेत पतीने तिच्यावर केला चाकूने हल्ला

पत्नी कुणाशीतरी फोनवर बोलत होती, दारूच्या नशेत पतीने तिच्यावर केला चाकूने हल्ला

पत्नीवर कुणासोबत तरी फोनवर बोलत असताना पतीला राग आला. यानंतर त्याने आपल्या पत्नीवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. (Husband Attacked on Wife) दिल्लीच्या आदर्श नगर परिसरात (Adarsh Nagar Delhi) ही घटना घडली.

  नवी दिल्ली, 13 मे : पत्नीवर कुणासोबत तरी फोनवर बोलत असताना पतीला राग आला. यानंतर त्याने आपल्या पत्नीवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. (Husband Attacked on Wife) दिल्लीच्या आदर्श नगर परिसरात (Adarsh Nagar Delhi) ही घटना घडली. पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर (Wife Injured) जखमी झाली आहे. तर पतीला अटक करण्यात आली आहे. अस्मा असे हल्ला झालेल्या पत्नीचे नाव आहे. नेमके काय आहे प्रकरण? इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, असे सांगण्यात येत आहे की, जेव्हा पतीने त्याच्या पत्नीवर हल्ला केला तेव्हा त्याच्या 12 वर्षीय मुलीने आईला वाचवायचा प्रयत्न केला आणि तिच्या वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिलाही जोरदार मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. यावेळी पती दारुच्या नशेत होता. तो घरी परतला तेव्हा त्याने पाहिले की, त्याची पत्नी कुणासोबत तरी फोनवर बोलत आहे. (Wife on Call with Someone) मुलीने वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र... यानंतर तो तिच्यावर संतापला. याच संतापातून त्याचे चाकू घेतला तसेच तिच्यावर हल्ला केला. यावेळी दुसऱ्या रुममध्ये झोपलेली त्यांची मुलगी उठली. तिने आपल्या वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिला मारहाण केली. तसेच आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला करत तिला रक्तबंबाळ अवस्थेत सोडले. हेही वाचा - विधवा सांगून केले लग्न, आठवड्याभरातच पैसे आणि दागिने घेऊन तरुणी फरार
  या घटनेची माहिती शेजाऱ्यांना मिळाली. शेजाऱ्यांनी लगेचच या घटनेबाबत पोलिसांना सांगितले. तसेच शेजाऱ्यांनी त्या महिलेला रुग्णालयात घेऊन गेले. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची अवस्था गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी आयपीसी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हल्ला करण्यासाठी वापरलेला चाकूही जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Delhi News, Wife and husband

  पुढील बातम्या