इंदूर, 13 मे : विवाह केल्यानंतर आठवड्याभरातच नववधू तरुणी
(Bride) पैसे आणि दागिने घेऊन फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन लाखांची रोकड, दोन सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र आणि घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे
(Gold-Silver Jewellery) दागिने घेऊन ती फरार झाली आहे. यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पोलीस लुटारू वधू आणि तिच्या टोळीचा शोध घेत आहेत. यानंतर वरमुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणीसह दलालांविरुद्ध फसवणूक आणि इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे सर्वजण फरार आहेत.
काय आहे नेमके प्रकरण -
इंदूरच्या बाणगंगा पोलीस ठाणे हद्दीतील रेवती रेंजमधील रहिवासी विजया पडना यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा राहुलची ओळख काजल उर्फ ज्योती आणि राधेश्याम यांच्याशी झाली होती. हे लोक दलाली घेऊन लग्न लावायचे. या टोळीने आपल्या मुलाला शिकार बनविले. यानंतर पोलिसांनी विजया पडना यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. राहुल आणि ललिता यांचे लग्न 10 जुलैला झाले होते. ललिता ही विधवा आहे, असे सांगून तिचे लग्न लावून देण्यात आले होते. लग्नाआधी छत्तीसगडच्या भिलाईमध्ये लग्नाआधी साखरपुडा आणि इतर विधी पार पडले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वधूने मासिक पाळीचे कारण देऊन शारीरिक संबंधाला नकार दिला. मात्र, यानंतर फक्त सात दिवसातच ती तरुणी फरार झाली. यानंतर वरमुलाच्या परिवाराने दलालाकडे धाव घेतली. मात्र, तिथेही एक धक्कादायक बाब नजरेस पडली. यावेळी ही तरुणी दलालासोबत त्याच्या घरी आपत्तीजनक स्थितीत मिळाली.
हेही वाचा - कोटामध्ये कोचिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू; खोलीत संशयास्पद आढळला मृतदेह
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी छत्तीसगड येथेही एक टीम पाठवली आहे. ही एक मोठी टोळी असून त्यात अनेक लोक सामील असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. आरोपींच्या अटकेनंतरच आणखी माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.