Home /News /national /

लॉकडाऊनमुळे बायको अडकली माहेरी, नवऱ्याने रागाच्या भरात प्रेयसीशी लग्न करुन थाटला संसार

लॉकडाऊनमुळे बायको अडकली माहेरी, नवऱ्याने रागाच्या भरात प्रेयसीशी लग्न करुन थाटला संसार

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा

नवऱ्याची करामत ऐकल्यानंतर पहिल्या बायकोचा पारा चढला आणि तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

    पाटणा, 23 एप्रिल : सध्या देशभरात कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संकटामुळे लोक लॉकडाऊनचं पालन करीत आहे. सरकारने लॉकडाऊन लागू केल्यानंतर घरापासून लांब दुसऱ्या राज्यात वा शहरात असलेल्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेक मजुर लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. त्यांना घरी जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्याने अनेकजण पायी, रेल्वे ट्रॅकवरुन प्रवास करीत आहेत. अशीच विचित्र गोष्ट बिहारमधील पाटण्यात घडली आहे. पाटण्यात एका व्यक्तीची पत्नी आपल्या माहेरी गेली होती. मात्र त्यातच लॉकडाऊन लागू झाल्याने ती आई-वडिलांकडेच अडकून पडली. त्या महिलेचे नाव गुडीया देवा असे आहे. पत्नीने आपल्या नवऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुडीया देवी यांच्या पतीचे नाव धीरज कुमार असे आहे. त्यांना एक मुलगाही आहे. गुडीया आपल्या आई वडिलांना भेटायला जेहनाबाद जिल्ह्यात गेली होती. तिचं माहेर पाटण्यापासून 60 किमी अंतरावर आहे. त्यातच सरकारने लॉकडाऊन लागू केल्यानंतर ती तेथेच अडकून पडली. लॉकडाऊनमध्ये वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. अशात गुडियाला नवऱ्याकडे येणं शक्य होत नव्हतं. यावर नवऱ्याने विचारणा केली असता गुडियाने नियम तोडून येणार नसल्याचं सांगितले. यामुळे धीरज कुमार याचा राग अनावर झाला आणि त्याने त्यांच्या घराजवळ राहण्याऱ्या प्रेयसीशी लग्न केले आणि तिच्यासोबत घरात एकत्र राहू लागला. हे पहिल्या पत्नीला कळल्यानंतर तिचा पारा चढला आणि तिने पोलिसात तक्रार केली. तक्रारीनंतर धीरज कुमार याला ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित -घरी पोहोचण्यासाठी मजुरांची मोठी जोखीम, रस्ता सापडला नाही म्हणून नदीत मारली उडी चांगली बातमी! 23 राज्यातील 78 जिल्ह्यात 14 दिवसांपासून कोरोनाचा नवा रुग्ण नाही मालेगावात कोरोनाचं थैमान सुरूच, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 110 वर
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या