रायपूर, 17 नोव्हेंबर : तेरा वर्षं ते दोघे एकमेकांच्या प्रेमात होते, इतके की एकमेकांशिवाय दोघांचं पानही हलत नव्हतं. सगळ्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना दोघांच्या प्रेमाचं कौतुक होतं. पण याच प्रेमामुळे पतीच्या मृत्यूचा धक्का ती पचवू शकली नाही. छत्तीसगडच्या भिलाईमध्ये या खळबळजनक आत्महत्येची चर्चा आहे.
रायपूरच्या गोलाबाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणी निखत अंजुम यांचा आत्महत्येमुळे मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. निखतचा पती जाहिद अख्तर (वय 46)गेले काही दिवस आजारी होता. त्याच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. रायपूरच्या एका खासगी रुग्णालयात त्याने 14 नोव्हेंबरला अखेरचा श्वास घेतला. नवऱ्याच्या मृत्यूने निखत कोलमडून गेली. जाहिरच्या मृत्यूच्याच दिवशी निखतने नवऱ्याच्या whatsapp वर स्टेटस मेसेज लिहिला - 'अलविदा दोस्तों. भूल चूक माफ कर देना'. हा मेसेज लिहिल्यानंतर थोड्याच वेळात निखतने चेहऱ्यावर प्लास्टिकची पिशवी ओढून घेतली आणि दुपट्ट्याने पिशवीसकट स्वतःचा गळा आवळला.
मोबाईलवर मेसेज बघून नातेवाईकांना शंका आली. पण ते येऊन बघेपर्यंत निखतचा मृत्यू झालेला होता. गोलाबाजार ठाण्याच्या पोलिसांनी सांगितलं की, शवविच्छेदनात जीव गुदमरून मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे.
जाहिदच्या मित्रांनी सांगितलं की, 2004 पासू निखत आणि जाहिद यांची मैत्री होती. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 2008 मध्ये त्यांनी निकाल केला. जाहिद एका खासगी कंपनीत कामाला होता. तर निखत घरातूनच शिलाई केंद्र चालवत होती. 10 नोव्हेंबरला अचानक जाहिदला पॅरालिसिसचा अॅटॅक आला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हापासूनच निखत प्रचंड धक्क्यात होती. शेवटी एका मोठ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच जाहिदचा मृत्यू झाला. रात्री उशिरा ही बातमी ऐकल्यानंतर निखतनेही स्वतःच्या ओढणीने गळा आवळून आत्महत्या केली.
पती-पत्नीच्या अशा अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.