मुंबई, 12 सप्टेंबर: या जगात असं कोणीही नसेल ज्यांना Ice Cream आवडत नाही. काही लोक अक्षरशः आईसक्रीम वेडे असतात. पण जर आम्ही म्हंटलं की हेच Ice Cream खाऊन तुम्ही भरघोस पैसे कमवू शकता. इतकंच नाही तर यात नोकरीही (Weired jobs) करू शकता तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. जगात अशा काही कंपनी आहेत ज्या त्यांचं Ice Cream खाण्यासाठी कर्मचारी कामावर ठेवतात. या कर्मचाऱ्यांना Ice Cream खाण्याचा (Ice Cream tester jobsf) पगारही दिला जातो. मात्र असं का होतं? Ice Cream खाण्याचा पगार का दिला जातो? हेच आपण आज समजून घेणार आहोत.
Ice Cream खाणाऱ्या व्यक्तीला आवडतं म्हणून Ice Cream दिलं जात नाही तर यामागे एक प्रमुख कारण आहे. या व्यक्तीचं काम सर्वात महत्त्वाचं आहे. कोणतीही कमानी Ice Cream तयार करताना संपूर्ण Ice Creamची चव घेऊन बघू शकत नाही. तसंच लोकांना त्या Ice Creamची चव आवडेल का याचा अंदाज घेऊ शकत नाही. म्हणूनच अशे काही कर्मचारी कामावर घेतले जातात जे या Ice Cream ची चव चांगली की वाईट हे सांगू शकतील. तसंच Ice Cream वरील सर्व गोष्टी बरोबर आहेत का हे तपासतात.
एका आइस्क्रीम टेस्टरला एक टेस्ट टेस्टर (Taste Tester) किंवा अन्न शास्त्रज्ञ (Food Scientist) म्हणूनही ओळखलं जातं, प्रत्येक प्रकारचं आइस्क्रीम योग्य प्रमाणात, पोत आणि चव असलेलं आहे याची खात्री करण्यासाठी यांना घेतलं जातं. भूमिका आणि कंपनीच्या आधारावर, नवीन आइस्क्रीम फ्लेवर्सचा शोध लावण्यामध्ये टेस्टर देखील सामील होऊ शकतात.
यासाठी विशेष शिक्षण असणं महत्त्वाचं नाही. मात्र काही कंपन्या या कामासाठी अति उत्तम चव चाखू शकणारे उमेदवार निवडतात. तसंच जर तुमच्याकडे फूड सायन्सची पदवी आले तर तुम्ही फूड सायंटिस्ट म्हणूनही काम करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Job