मुंबई, 26 मार्च : प्रॉपर्टीचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. मोठमोठ्या शहरांमध्ये घर घेणं हे सामान्यांच्या आवाक्यात राहिलेलं नाही; मात्र अमेरिकेत एक आलिशान घर तुलनेने कमी किमतीत विक्रीला काढलेलं असूनही ग्राहक ते घर विकत घेत नाही आहेत. काय आहे त्यामागचं कारण? घर विकत घेणं ही सोपी गोष्ट नसते. जागा, किंमत सगळं जुळून आलं तरी बरेचदा व्यवहार फिस्कटतात. काही वेळा घर विकत घेतल्यानंतर मालकाला काही त्रास उद्भवतात. काही वेळा घराच्या आत गेल्यावर प्रसन्न वाटत नाही. भारतीय समाजात अशा गोष्टी लोकांना खऱ्या वाटतील; पण इतर देशांमध्येही या गोष्टी घडतात. अमेरिकेतल्या एका घराचा व्यवहार याच गोष्टीमुळे चर्चेत आलाय. घराच्या जागेच्या तुलनेत घराची किंमत फारशी नाहीये; मात्र कोणीही ग्राहक ते घर घ्यायला उत्सुक नाही.
मिररच्या वृत्तानुसार, 2 एकर जागेवर तयार केलेल्या या घरात 3 बेडरूम्स आहेत. घर इतकं मोठं असूनही 1,25,000 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 1 कोटी रुपये इतकी त्याची किंमत ठेवली आहे. किंमत कमी असूनही ते घर कोणीच घेऊ इच्छित नाही. बिग कंट्री रिइल इस्टेट एजन्सीनं घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता हे फोटो भरपूर व्हायरल होताहेत.
हेही वाचा - धक्कादायक! मंदिराच्या दारातच रशियन मुलीसोबत नको ते कृत्य केलं अन्…
फेसबुकवर या भूतबंगल्याचे फोटो शेअर झाल्यावर ते खूप व्हायरल झाले. त्यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. या बंगल्यात हॅलोविनसाठी येऊ शकतो; मात्र कायमस्वरूपी राहणं शक्य नाही, असे अनेकांनी म्हटलं आहे. हा बंगला भूत बंगला म्हणूनच वापरला गेला असेल. तिथे कोणीही राहत नसेल, असं अनेकांना वाटतंय. तसंच घराचं इंटीरिअर बदललं तरी तिथे राहण्याची हिंमत होणार नाही, असंही मत अनेकांनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Photo viral, Social media, Video viral