मराठी बातम्या /बातम्या /देश /

सूर्यास्तानंतर का केलं जात नाही शवविच्छेदन? एका नियमामुळे पीडित कुटुंबाला करावा लागतो अडचणींचा सामना

सूर्यास्तानंतर का केलं जात नाही शवविच्छेदन? एका नियमामुळे पीडित कुटुंबाला करावा लागतो अडचणींचा सामना

शवविच्छेदनाच्या कायदेशीर प्रकियेबाबत (Legal process) स्वातंत्र्याआधी बनलेले नियमच अजूनही प्रचलित आहेत. हे नियम इतके जुने झाले आहेत, की यामुळे अनेक कुटुंबांना त्रास सहन करावा लागतो.

शवविच्छेदनाच्या कायदेशीर प्रकियेबाबत (Legal process) स्वातंत्र्याआधी बनलेले नियमच अजूनही प्रचलित आहेत. हे नियम इतके जुने झाले आहेत, की यामुळे अनेक कुटुंबांना त्रास सहन करावा लागतो.

शवविच्छेदनाच्या कायदेशीर प्रकियेबाबत (Legal process) स्वातंत्र्याआधी बनलेले नियमच अजूनही प्रचलित आहेत. हे नियम इतके जुने झाले आहेत, की यामुळे अनेक कुटुंबांना त्रास सहन करावा लागतो.

  • Published by:  Kiran Pharate

जोधपूर 08 मार्च : हत्या, अपघात किंवा अन्य एखाद्या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं शवविच्छेदन (Post mortem) करणं अतिशय गरजेचं असतं. मात्र, शवविच्छेदनाच्या कायदेशीर प्रकियेबाबत (Legal process) स्वातंत्र्याआधी बनलेले नियमच अजूनही प्रचलित आहेत. हे नियम इतके जुने झाले आहेत, की यामुळे अनेक कुटुंबांना त्रास सहन करावा लागतो. नियमांमुळे बांधलं गेल्यानं डॉक्टर आणि पोलिसही इच्छा असतानादेखील काही करू शकत नाहीत.

शवविच्छेदनासाठी डॉक्टर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 174 ब्रिटीश सरकारने सन 1898 मध्ये बनविली होती. हा काळ असा होता की सर्वत्र वीज नव्हती तसंच गैरसमज आणि अंधश्रद्धा अधिक होती. त्यावेळी केवळ सूर्यप्रकाशामध्ये शवविच्छेदन करणं शक्य होते. याची दोन कारणे होती. पहिलं म्हणजे, सर्वत्र वीज उपलब्ध नव्हती आणि दुसरं म्हणजे डॉक्टर रात्री मृतदेहाजवळ जाण्यास घाबरत होते. यामुळे असे नियम बनविण्यात आले.

आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल, की आजही त्यावेळी बनविलेले नियम पाळले जातात. 1974 मध्ये या नियमांमध्ये अंशतः दुरुस्त्या करण्यात आल्या असल्या तरी ते केवळ दिखावा असल्याचे सिद्ध झाले आहे. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि शवविच्छेदन आवश्यक असेल मात्र सूर्यास्त झाला तर परिस्थिती गंभीर बनते. कारण नियमानुसार शवविच्छेदन रात्री (अपवाद वगळता) करता येणार नाही. जरी मृताचा मृतदेह शेकडो किलोमीटर दूर घेऊन जायचा असला तरीही. अशा परिस्थितीत सूर्योदय होण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

कायदेशीर तज्ञ ज्येष्ठ वकील सुखदेव व्यास यांचं म्हणणं आहे, की सन 1898 मध्ये ब्रिटिश सरकारच्या फौजदारी प्रक्रियेच्या कलम 174 मध्ये पोस्टमार्टमचा उल्लेख आहे. 1974 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली पण ही घटना नाममात्र होती. त्यानुसार, एखाद्याचा अपघात किंवा हत्या झाल्यानंतर संबंधित परिसरातील पोलीस अधिकारी डॉक्टरांना याबाबत माहिती देतील.डॉक्टर घटनास्थळी पोहोचून दोन साथीदारांच्या उपस्थितीत सूर्याच्या प्रकाशात शवविच्छेदन करतील. मात्र, आजकाल असं होत नाही. आता एखाद्याचा अपघात किंवा हत्या झाल्यानंतर मृताचा मृतदेह मोर्चरीमध्ये ठेवला जातो. बंद खोलीत कोणत्याही साक्षीदाराशिवाय शवविच्छेदन केलं जातं, हे कायद्यानं चुकीचं आहे.

वरिष्ठ अधिवक्ता सुखदेव व्यास यांनी सांगितलं, की आधी सगळ्या ठिकाणी वीज नसायची. उजेडासाठी मशाली किंवा पिवळे बल्ब लावले जात. यात एखाद्या व्यक्तीला जखम झाल्यानंतर त्याचा रंगही लालच्या जागी जांभळा दिसत असे. याशिवाय तेव्हा अंधश्रद्धा खूप जास्त होती आणि लोकांचं असं म्हणणं होतं, की रात्री मृताच्या शरीरात आत्मा परत येतो. त्यामुशे, भूत प्रेताच्या अफवांमुळे डॉक्टर रात्री शवविच्छेदन करत नसत.

सुखदेव व्यास म्हणाले, की मृतालाही मानवी हक्कदेखील आहेत. मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे हा त्यांचा हक्क आहे. ते म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर, शवविच्छेदन जितकं लवकर केलं जाईल तितका अहवाल अधिक अचूक येतो. अशा परिस्थितीत या कायद्यात बदल करुन रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करण्यात सुरुवात करायला हवी.

जोधपूर येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये कार्यरत फॉरेन्सिक मेडिकल विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. बिनाका गांधी म्हणाले की, सूर्यास्तानंतर एखाद्याचे शवविच्छेदन करण्याचा डॉक्टरांना अधिकार नाही. परंतु दंडाधिकारी किंवा न्यायाधीशांच्या आदेशानंतर तसे करणे शक्य आहे. अशा आदेशानंतर त्यांनी स्वत: रात्रीचं शवविच्छेदन केलं आहे. त्यांनी सांगितलं, की हे खरं आहे, की पूर्वी पिवळे बल्ब असल्यानं रंगात गोंधळ होत असे. मात्र, आता काळ बदलला आहे आणि सगळं इतकं विकसित झालं आहे, की विविध प्रकारच्या एलईडी आणि पांढऱ्या रंगाच्या लाईटही आल्या आहेत. अशा लाईटमध्ये शवविच्छेदन केलं जाणं शक्य आहे. अशात या कायद्यात बदल करणं गरजेचं आहे.

रात्री पोस्टमार्टम न केल्याने, या नियमांमुळे अनेक पीडित कुटुंबांलाही त्रास सहन करावा लागत आहे. जोधपूर येथील इंद्रसिंग गेहलोत यांनीही अशाच घटनेचा सामना केला आहे. एका दुर्घटनेत त्यांचा मुलगा आणि दोन साथीदार जखमी झाले होते. रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पण तोपर्यंत सूर्य मावळला होता. डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, की त्यांना हे मृतदेह भीलवाडा येथे घेऊन जायचे आहेत. मात्र, डॉक्टरांनी काहीही ऐकून घेतलं नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि यानंतर गावी घेऊन जात तिसऱ्या दिवसी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. तेव्हापर्यंत पूर्ण कुटुंबानं भोजनही केलं नव्हतं, कारण हिंदू मान्यतेनुसार, एखाद्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार होईपर्यंत भोजन केले जात नाही.

First published:

Tags: Dead body, Examination, India, Postmortem