मराठी बातम्या /बातम्या /देश /

जयललितांच्या मृत्यूचं गूढ कायम! पाठराखीण शशिकला यांच्यासह चौघांवर आयोगाचा आरोप

जयललितांच्या मृत्यूचं गूढ कायम! पाठराखीण शशिकला यांच्यासह चौघांवर आयोगाचा आरोप

पाठराखीण शशिकला यांच्यासह चौघांवर आयोगाचा आरोप

पाठराखीण शशिकला यांच्यासह चौघांवर आयोगाचा आरोप

Jayalalithaa death reason: तामिळनाडूच्या लोकप्रिय मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या विश्वासू व्हीके शशिकला यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

चेन्नई, 18 ऑक्टोबर : तामिळनाडूच्या लोकप्रिय मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्यासोबत सावलीसारख्या असणाऱ्या व्हीके शशिकला यांच्या चौकशीची मागणी केली आहे. तामिळनाडू सरकारने माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी आयोगाचा चौकशी अहवाल मंगळवारी विधानसभेत सादर केला. 2016 मध्ये जयललिता यांच्या मृत्यूच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती ए अरुमुघस्वामी आयोग स्थापन करण्यात आला होता. या अहवालात दिवंगत मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू व्हीके शशिकला यांच्या विरोधात चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या अहवालात शशिकला यांच्याशिवाय आणखी दोन जणांची नावे आहेत, ज्यांची चौकशी सुरू आहे.

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि AIADMK नेत्या जे जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या अरुमुघस्वामी चौकशी समितीचा अहवाल मंगळवारी विधानसभेत मांडण्यात आला.

यांच्याविरुद्ध चौकशी

अरुमुघस्वामी चौकशी आयोगाने असा निष्कर्ष काढला की शशिकला, जयललिता यांचे वैयक्तिक डॉक्टर केएस शिवकुमार, तत्कालीन आरोग्य सचिव राधाकृष्णन, सी. विजयभास्कर, जे त्यावेळचे आरोग्य मंत्री होते, दोषी आढळले आहेत. या सर्वांची चौकशीचे आदेश देण्यात यावे.

आयोगाने ऑगस्टमध्ये आपला अहवाल दिला

ऑगस्टच्या सुरुवातीला, जे जयललिता यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती अरुमुघस्वामी यांच्या एकल सदस्यीय आयोगाने पाच वर्षांनी आपला अहवाल तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना सचिवालयात सादर केला होता.

जललिता यांचे 2016 मध्ये निधन

डिसेंबर 2016 मध्ये जयललिता यांच्या निधनानंतर, त्यांच्या मृत्यूचे कारण आणि रुग्णालयात दाखल करताना करण्यात आलेल्या वैद्यकीय प्रक्रियांवरून सर्वत्र राजकारण झाले. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यामुळे अरुमुघस्वामी आयोगाची स्थापना झाली.

वाचा - शिवसेनेनंतर पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव; रोहित पवारांचा धक्कादायक आरोप

अहवाल इंग्रजी आणि तमिळमध्ये तयार केला

22 सप्टेंबर 2016 रोजी दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याची परिस्थिती, प्रकृतीची स्थिती याची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्यात आला होता. 5 डिसेंबर 2016 रोजी त्यांचे दुर्दैवी निधन होईपर्यंत उपचार सुरू होते. अरुमुघस्वामी यांनी त्यांचा 608 पानांचा अंतिम अहवाल तमिळमध्ये आणि 500 पानांचा अहवाल इंग्रजीत दाखल केला आहे.

159 साक्षीदारांची साक्ष

अरुमुघस्वामी आयोगासमोर जयललिता यांच्या संदर्भात 159 हून अधिक साक्षीदार हजर झाले होते. त्यांनी आपले म्हणणे मांडले. उल्लेखनीय म्हणजे, अरुमुघस्वामी आयोगाने नोव्हेंबर 2017 मध्ये जयललिता यांचे निकटवर्तीय आणि उपचार करणारे डॉक्टर, तामिळनाडूचे तत्कालीन आरोग्यमंत्री विजयभाकर, तत्कालीन आरोग्य सचिव राधाकृष्णन, तत्कालीन अर्थमंत्री आणि AIADMKचे वरिष्ठ नेते ओ पनीरसेल्वम यांच्या अनेक सुनावणीसोबत चौकशी सुरू केली होती.

अपोलो हॉस्पिटलला दिलासा

दरम्यान, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या डॉक्टरांच्या पॅनेलने दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की दिवंगत जयललिता यांना दिलेले उपचार योग्य वैद्यकीय पद्धतीनुसार होते. उपचारामध्ये कोणतीही त्रुटी आढळली नाही. या क्लीन चिटमुळे जयललिता ज्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या त्यांना दिलासा मिळाला.

First published:

Tags: Jaylalitha, Tamilnadu