नवी दिल्ली, 18 मे : देशात काशी विश्वनाथ मंदिर
(Kashi Vishwanath Temple), ज्ञानवापी मशीद
(Gyanvapi Musjid) आणि ताजमहालनंतर आता कुतुबमिनारबाबत
(Qutub Minar) नवीन वादाला तोंड फुटू शकते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या एका माजी अधिकाऱ्याने कुतुबमिनारबाबत मोठा दावा केला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, कुतुबमिनार सम्राट विक्रमादित्यने पाचव्या शतकात बांधला होता. त्याने सांगितले की विक्रमादित्यने हा स्तंभ बांधला. कारण त्याला सूर्याच्या स्थानांचा अभ्यास करायचा होता.
माजी ASI अधिकाऱ्याचे 3 मोठे दावे
कुतुबमिनार नाही तर सूर्य स्तंभ
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत माजी ASI प्रादेशिक संचालक धरमवीर शर्मा यांनी दावा केला आहे की कुतुबमिनार कुतुबुद्दीन ऐबकने बांधला नव्हता. ते म्हणाले की, हा कुतुबमिनार नाही, सूर्य स्तंभ आहे. या संदर्भात माझ्याकडे बरेच पुरावे आहेत. एएसआयच्या वतीने शर्मा यांनी कुतुबमिनारचे अनेकवेळा सर्वेक्षण केले आहे.
मिनारच्या बुरुजाला 25 इंचाचा कल आहे
ते म्हणाले, 'कुतुबमिनारचा बुरुज 25 इंच झुकलेला आहे, कारण येथून सूर्याचा अभ्यास केला गेला. त्यामुळेच 21 जूनला सूर्य आकाशात जागा बदलत असताना, अर्धा तास त्या ठिकाणी कुतुबमिनारची सावली पडत नाही. हे विज्ञान आहे आणि पुरातत्वीय पुरावाही आहे.'
रात्री ध्रुव तारा दिसला
शर्मा यांनी सांगितले की, लोकांचा दावा आहे की कुतुबमिनार ही एक स्वतंत्र इमारत आहे. तिचा संबंध जवळच्या मशिदीशी नाही. वास्तविक, त्याचे दरवाजे उत्तराभिमुख आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळी ध्रुव तारा दिसू शकतो.
असा मुस्लिम शासक ज्याने अनेक मंदिरे, विद्यापीठांसह संस्थांना दिलं भरभरुन दान! पुण्यातील संस्थेचाही समावेश
हिंदू संघटनांची कुतुबमिनारचे नाव बदलण्याची मागणी
गेल्या आठवड्यात हिंदू संघटनांनी कुतुबमिनार संकुलात हनुमान चालिसाचे पठण केले आणि त्याला विष्णूस्तंभ असे नाव देण्याची मागणी केली. जैन आणि हिंदू मंदिरे पाडून कुतुबमिनार बांधण्यात आल्याचा दावा संयुक्त हिंदू आघाडीने केला आहे. पोलिसांनी संघटनेच्या काही लोकांना ताब्यात घेतले होते.
कुतुबमिनारचा इतिहास वादग्रस्त राहिला आहे
दिल्ली पर्यटन वेबसाइटनुसार, कुतुबमिनार 1193 मध्ये दिल्लीचा पहिला मुस्लिम शासक कुतुबुद्दीन ऐबक यांनी बांधला होता. दिल्लीच्या शेवटच्या हिंदू शासकाचा पराभव केल्यानंतर त्यांनी या 73 मीटर उंच इमारतीचे बांधकाम सुरू केले.
मात्र, त्यांना फक्त तळघर बांधता आले. त्याच्यानंतर इल्तुतमशने तीन मजली बांधली आणि त्याच्यानंतर 1368 मध्ये फिरोजशाह तुघलकाने उर्वरित दोन मजले बांधले.
पहिले तीन मजले लाल दगडाचे आणि चौथे-पाचवे मजले संगमरवरी आणि सँडस्टोनचे आहेत. टॉवरच्या खाली कुव्वत-अल-इस्लाम मशीद आहे, जी भारतात बांधलेली पहिली मशीद असल्याचे म्हटले जाते.
मशिदीच्या प्रांगणात 5 मीटर उंच लोखंडी खांब आहे, ज्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो शुद्ध लोखंडाचा बनलेला आहे, परंतु आजपर्यंत त्याला कधीही गंज चढलेला नाही. हा लोखंडी स्तंभ राजा चंद्रगुप्त विक्रमादित्य (राज 375-412) याने बांधला असे मानले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.