• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • काय चाललंय काय? बंद फॅक्टरीचं विजेचं बिल 90 कोटी; आकडा पाहून मालक शॉक

काय चाललंय काय? बंद फॅक्टरीचं विजेचं बिल 90 कोटी; आकडा पाहून मालक शॉक

काही दिवसांपूर्वी असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला होता.

 • Share this:
  हरियाणा, 19 जून : हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील कालांवालीमध्ये लॉकडाऊनदरम्यान एका राइस मिलची फॅक्टरी बंद झाली असताना 90 कोटी रुपयांहून अधिक बिल पाठविण्यात आलं आहे. लॉकडाऊन काळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये अगदी शेतकऱ्यांपासून ते गरीब घरातील नागरिकांना लाखो रुपयांचं बिल पाठविण्यात आलं आहे. विजेचं बिल आल्यानंतर गणेश राइस इंडस्ट्रिजच्या मालकाने सांगितलं की, सर्वसाधारणपणे आम्हाला 5 ते 6 लाखांचं बिल येतं, मात्र फॅक्ट्री बंद असतानाही आम्हाला थेट 90,137 कोटी रुपयांचा बिल आलं आहे. आम्ही या प्रकरणात वीज वितरण विभागाकडे याची तक्रार केली आहे. 90 कोटी रुपयांच्या वीज प्रकरणात विभागाचे एसडीओ रवी कुमार यांनी सांगितलं की, नवी सॉफ्टवेअरमध्ये झालेल्या गोंधळामुळे 90 कोटी रुपयांचं बिल पाठविण्यात आलं. आता या बिलात दुरुस्ती करण्यात आली असून याला अपडेट करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी असंच एक प्रकरण जींद जिल्ह्यात पाहायला मिळालं होतं. येथे वीज वितरण विभागाकडून 16 हजार रुपयांचं बिल पाठविण्यात आलं होतं. त्याला हे बिल जास्त वाटत असल्याने त्याने विभागाकडे यात दुरुस्ती करण्याचं पत्र लिहिलं होतं. यानंतर मात्र वीज वितरण विभागाने 69 लाखांहून अधिकच नवीन बिल ग्राहकाला पाठवलं होतं. याशिवाय बिल भरण्यास उशीर झाल्यास 2 लाख रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असंही बिलमध्ये म्हटलं होतं. हे ही वाचा-21 वर्षांच्या तरुणाकडून मोठा हत्यारांचा साठा जप्त; कुटुंबही सामील कोरोना काळ सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी अतिरिक्त बिलाची रक्कम पाहून ग्राहक हैराण झाले आहेत.
  Published by:Meenal Gangurde
  First published: