मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai : 21 वर्षांच्या तरुणाकडून मोठा हत्यारांचा साठा जप्त; संपूर्ण कुटुंब पिस्तूल व्यवसायात सामील

Mumbai : 21 वर्षांच्या तरुणाकडून मोठा हत्यारांचा साठा जप्त; संपूर्ण कुटुंब पिस्तूल व्यवसायात सामील

मुंबईच्या वेशीवर मुलूंड येथे हत्यारांचा एक मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. हत्यारांची तस्करी करणारा लाखन सिंग याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मुंबईच्या वेशीवर मुलूंड येथे हत्यारांचा एक मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. हत्यारांची तस्करी करणारा लाखन सिंग याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मुंबईच्या वेशीवर मुलूंड येथे हत्यारांचा एक मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. हत्यारांची तस्करी करणारा लाखन सिंग याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मुंबई, 19 जून : मुंबईच्या वेशीवर मुलूंड येथे हत्यारांचा एक मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. हत्यारांची तस्करी करणारा लाखन सिंग याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली असून गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई पोलिसांचे क्राईम ब्रांचचे पथक लाखन सिंग याचा शोध घेत होते.

मुंबईच्या वेशीवर लाखन सिंग हा त्याच्या साथीदारांसह हत्यारांची मोठी डिलिव्हरी करायला येणार आहे, अशी माहिती मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना त्यांच्या सुत्रामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार मुंबईच्या वेशीवर मुलुंड येथे पोलीस निरीक्षक श्रीधनकर यांनी लाखन सिंग  आणि त्याच्या दोन साथीदारांना सापळा रचून पकडलं आहे. दरम्यान दोघांमध्ये झटापटही झाली होती. या झटापटीत लाखन सिंग पोलिसांच्या हाती लागला, मात्र त्याचे दोन साथीदार पळून जाण्यास यशस्वी झाले.

धक्कादायक म्हणजे लाखन सिंग याला मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली तेव्हा त्याच्या जवळून पोलिसांनी एक बॅग जप्त केली आहे. या बॅगेत हत्यारांचा मोठा साठा होता. 10 देशी बनावटीची पिस्तूले, 2 गोळ्यांची मॅगजीन आणि काही जिवंत काडतुसे असा भला मोठा हत्यारांचा साठा त्या बॅगेत होता. पोलिसांनी लाखन सिंगला अटक केली असून तो सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने 3 जणांना 2 पिस्तूल आणि जिवंत काडतूसांसह अटक केली होती.

तपासणी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, लाखन सिहं हा मध्य प्रदेशातील बरुवानी जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि त्या जिल्ह्यात असं एक गाव आहे जिथे बहुतेक लोक शस्त्रे बनवण्याचे काम करतात आणि लाखन सिंह याचा कौटुंबिक व्यवसाय शस्त्रे बनवण्याचा आहे. तो या शस्त्रांची वेगवेगळ्या राज्यात विक्रीदेखील करतो.

हे ही वाचा-ऑनलाइन क्लासमध्ये शिक्षिकेला प्रायव्हेट पार्ट दाखवित होता 9 वीचा विद्यार्थी

त्यांच्या चौकशीतून हत्यार तस्कर लाखन सिंग याचे नाव समोर आले होते. तेव्हा पासून मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे पथक लाखन सिंग याचा शोध घेत होते. लाखन सिंग याने याआधी देखील अशाच पद्धतीने शेकडो हत्यारं मुंबईत विकली आहेत. विशेष करुन गुंडाना लाखन सिंग हा ही हत्यारं विकायचा. लाखन सिंग याने आणलेल्या हत्यारांचा सोर्स शोधणं अवघड आहे असा दावा केला जात होता. धक्कादायक म्हणजे लाखन सिंग याच्याकडून जप्त केलेली ही हत्यारं देशी बनावटीची असून यांत पिस्तुल बनवणा-या कंपण्यांचा सहभाग आहे का? असा संशय मुंबई क्राईम ब्रांचला आहे. तर आता या लाखन सिंगकडून कोणत्या गुंडांनी कोणत्या व्यापा-याने पिस्तुल विकत घेतले याचा देखील शोध मुंबई पोलीस करणार आहेत त्यामुळे अनेकांची नावे या तपासात समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Mumbai