मराठी बातम्या /बातम्या /देश /व्यापारी पियुष जैन यांच्या घरातून जप्त केलेले रोख 257 कोटींचं काय होणार? वाचा प्रक्रिया

व्यापारी पियुष जैन यांच्या घरातून जप्त केलेले रोख 257 कोटींचं काय होणार? वाचा प्रक्रिया

पियुष जैन 40 हून अधिक कंपन्यांचे मालक आहेत. यातील दोन कंपन्या मध्य पूर्वेतील आहेत. कन्नौजमध्ये पियुष यांचा परफ्यूम कारखाना, कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंप देखील आहे. पियुष यांचे मुंबईत मुख्य कार्यालय आहे.

पियुष जैन 40 हून अधिक कंपन्यांचे मालक आहेत. यातील दोन कंपन्या मध्य पूर्वेतील आहेत. कन्नौजमध्ये पियुष यांचा परफ्यूम कारखाना, कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंप देखील आहे. पियुष यांचे मुंबईत मुख्य कार्यालय आहे.

पियुष जैन 40 हून अधिक कंपन्यांचे मालक आहेत. यातील दोन कंपन्या मध्य पूर्वेतील आहेत. कन्नौजमध्ये पियुष यांचा परफ्यूम कारखाना, कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंप देखील आहे. पियुष यांचे मुंबईत मुख्य कार्यालय आहे.

मुंबई, 27 डिसेंबर : जीएसटी इंटेलिजन्सने केलेल्या कारवाईत कानपूरचे व्यापारी पियूष जैन (Piyush Jain) यांच्या घरातून 257 कोटी रुपये रोख आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. आता केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील या अब्जाधीश परफ्यूम व्यापार्‍याविरुद्ध आपला पेच घट्ट करताना दिसत आहे.

एवढ्या मोठ्या रकमेची वसुली लोकांनी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधून पाहिली. नोटांचे ढिग लोकांनी या कारवाईदरम्यान पाहिले. यानंतर आता एवढ्या पैशाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकार संपूर्ण रक्कम जप्त करणार की आणखी काही होणार?

याबाबत दोन परिस्थिती असतील

या प्रकरणातील तज्ञांचे म्हणणे आहे की अशा प्रकरणात दोन परिस्थिती असू शकतात. प्रथम, वसूल केलेल्या पैशांमधून 60 टक्के कर कापला जाऊ शकतो आणि उर्वरित रक्कम व्यापारी पियुष जैन यांना परत करता येईल. कारण, जे काही पैसे वसूल झाले आहेत, ते कर न भरता जमा केले आहेत. मात्र पीयूष जैन यांना हे सिद्ध करावे लागेल की त्यांनी केवळ कर न भरून इतका पैसा उभा केला आहे. म्हणजे सुमारे 155 कोटी रुपये वजा केल्यावर व्यावसायिक पियुष जैन यांना सुमारे 102 कोटी रुपये मिळतील.

एक देश एक आपत्कालीन नंबर, मोबाइल नेटवर्कशिवायही या नंबरवर कॉल करून मिळेल मदत

जर उत्पन्न बेकायदेशीर असेल तर…

पण, आणखी एक परिस्थिती उद्भवते. म्हणजेच, पीयूष जैन त्यांच्याकडे असलेला पैसा आणि दागिने किंवा इतर मालमत्ता, त्यांनी त्यांच्या व्यवसायातून कमावले आहेत आणि केवळ कर न भरूनच जमा केले आहेत, हे सिद्ध करू शकले नाही, तर त्यांच्यावर फौजदारी कलमांतर्गत कारवाई करण्यात येईल. अशा परिस्थितीत त्यांना पैसे परत मिळणार नाहीत. म्हणजे हा पैसा कोणत्याही बेकायदेशीर मार्गाने उभा केला असेल तर संपूर्ण पैसा जप्त केला जाईल.

5G ची प्रतीक्षा संपली! कधी आणि कोणत्या शहरांमध्ये सर्वात आधी होणार लॉन्चिंग

कोण आहेत पियुष जैन?

पियुष जैन यांचा जन्म कन्नौजमध्ये झाला, पण त्यांनी कानपूरमध्ये व्यवसाय सुरू केला. कनौजच्या जैन गल्लीत त्यांचे वडिलोपार्जित घर आहे, जे पूर्वी अगदी लहान होते. आता या घराचे आलिशान कॉटेजमध्ये रूपांतर झाले आहे. जैन रस्त्यावरील त्यांच्या शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनाही जैन कुटुंब इतके श्रीमंत असल्याची माहिती नव्हती. पियुष जैन यांचे वडील महेशचंद्र जैन हे पेशाने केमिस्ट आहेत. महेशच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. महेश यांच्याकडूनच त्यांची मुले पियुष आणि अंबरीश यांनी परफ्यूम आणि खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यासाठीचे सार कसे बनवायचे हे शिकले.

पियुष जैन यांचा व्यवसाय

पियुष जैन 40 हून अधिक कंपन्यांचे मालक आहेत. यातील दोन कंपन्या मध्य पूर्वेतील आहेत. कन्नौजमध्ये पियुष यांचा परफ्यूम कारखाना, कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंप देखील आहे. पियुष यांचे मुंबईत मुख्य कार्यालय आहे. यासोबतच त्यांचा तेथे एक बंगलाही आहे. पियुष जैन परफ्यूमचा संपूर्ण व्यवसाय मुंबईतून करतात. परफ्यूमही मुंबईतूनच परदेशात पाठवले जाते.

First published:

Tags: Business, GST