बंगळुरु, 7 सप्टेंबर : भारत सध्या कोरोना 19 महासाथीशी (Covid 19) लढा देत आहे. दररोज तब्बल 80000 हून अधिक प्रकरणं नोंदवली जात आहेत. मात्र अशा परिस्थितीत कर्नाटक (Karnataka) मधील एक कोविड रुग्णालयात (Covid Care Centre) बंद करण्यात येणार आहे. रुग्ण येत नसल्याने (Lack Of Patients) हे कोविड सेंटर बंद करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकाची राजधानी बंगळुरू (Bengaluru) स्थित हे रुग्णालयात भारतातील सर्वात मोठा केअर सेंटर आहे. हे सेंटर 15 सप्टेंबर रोजी बंद करण्यात येणार आहे.
कमी आणि लक्षणं नसणाऱ्या रुग्णांसाठी तयार केलं होतं कोविड सेंटर
या कोविड केअर सेंटरमध्ये कमी आणि लक्षणं असणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आला होता. या सेंटरमध्ये 10000 बेडची व्यवस्था करण्यात आली होती. आणि हा दावाही करण्यात आला होता की देशातील सर्वात मोठा कोविड केअर सेंटर आहे. आता मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा-आम्ही आमचा बाप गमावलाय! VIDEO शेअर करत मुलीनं सांगितली ICU बेड मिळवण्याची धडपड
क्वारंटाइन सुविधेनंतर सेंटरवर रुग्णांची संख्या झाली कमी
मिळालेल्या माहितीनुसार बैठकीत ठरविलेल्या कोविड सेंटरच्या अंथरुण, पंखे, पाणीचं मशीन आदी सामानांना सरकारी वसतिगृह आणि रुग्णालयांना देण्यात येणार आहे. कोरोनाचे कमी आणि लक्षणं नसलेल्या रुग्णालयांना होम क्वारंटाइनची सुविधा देण्यात आलेली आहे. या कारणाने आत कोविड केअर सेंटरमध्ये भर्ती होणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. जोपर्यंत होम क्वारंटाइनची सुविधा देण्यात आली नव्हती तोपर्यंत या केंद्रावर रुग्णांना मोठ्या संख्येने भर्ती केलं जात होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india