मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आम्ही आमचा बाप गमावलाय.... VIDEO शेअर करत नाशिकच्या मुलीनं सांगितली एक ICU बेड मिळवण्यासाठीची धडपड

आम्ही आमचा बाप गमावलाय.... VIDEO शेअर करत नाशिकच्या मुलीनं सांगितली एक ICU बेड मिळवण्यासाठीची धडपड

कुठे आहेत ऑक्सिजनची सुविधा असलेली रुग्णालयं? महाराष्ट्रातल्या Coronavirus साथीची खरी परिस्थिती उघड करणारा नाशिकच्या मुलीचा हा हादरवून टाकणारा आणि सरकारी दाव्याची पोलखोल करणारा VIDEO . तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटलं?

कुठे आहेत ऑक्सिजनची सुविधा असलेली रुग्णालयं? महाराष्ट्रातल्या Coronavirus साथीची खरी परिस्थिती उघड करणारा नाशिकच्या मुलीचा हा हादरवून टाकणारा आणि सरकारी दाव्याची पोलखोल करणारा VIDEO . तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटलं?

कुठे आहेत ऑक्सिजनची सुविधा असलेली रुग्णालयं? महाराष्ट्रातल्या Coronavirus साथीची खरी परिस्थिती उघड करणारा नाशिकच्या मुलीचा हा हादरवून टाकणारा आणि सरकारी दाव्याची पोलखोल करणारा VIDEO . तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटलं?

नाशिक, 7 सप्टेंबर : बाबांना वेळेत ICU बेड मिळाला असता, तर आज ते आमच्यात असते. Corona रुग्णांची देखभाल करायला पुरेशी रुग्णालयं उपलब्ध असल्याचे दावे केले जातात. कुठे आहेत ऑक्सिजनची सुविधा असलेली रुग्णालयं? सामान्यांना का करावी लागतेय एक ICU बेड मिळवण्यासाठी फिरफिर. उलट सेलेब्रिटी आणि राजकारण्यांना कसे लगेच अद्ययावत बेड रुग्णालयात उपलब्ध होतात? असे सवाल करत वडील गमावलेल्या एका तरुण मुलीनं तिची व्यथा एका VIDEO च्या माध्यमातून मांडली आहे.

रश्मी पवार नावाच्या एका तरुणीने फेसबुकवर केलेली पोस्ट प्रशासन, महापालिकेका आणि सरकारी दावे यांची पोलखोल करणारी आहे. रश्मीचे वडील एका फार्मास्युटिकल कंपनीत नोकरीला होते. Covid-19 ची लक्षणं दिसल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्याने ऑक्सिजनची सोय असलेल्या रुग्णालयात अॅडमिट व्हायची गरज निर्माण झाली. तिथून सुरू झाली कुटुंबीयांची धडपड. एका नामांकित रुग्णालयाने ICU बेड उपलब्ध आहे असं सांगत वाट पाहायला लावली आणि शेवटच्या क्षणाला आमच्याकडे आता बेड उपलब्ध नसल्याचं सांगितलं. एवढंच नाही तर, इतर रुग्णालयाशी संपर्कही साधून दिला नाही. "पेशंटलाठी बेड शोधून देणं हे आमचं काम नाही. तुमचं तुम्ही बघा", असं कुटुंबीयांना सांगण्यात आलं. श्वास घ्यायला त्रास होत असलेल्या, जीव धोक्यात असणाऱ्या रुग्णाला ऑक्सिजन बेडसाठी कशी वणवण करावी लागते, याचे काटा आणणारे अनुभव रश्मीने सांगितले आहेत.

'सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना लगेच बेड्स कसे उपलब्ध होतात असा संतप्त सवाल तिने या पोस्टच्या माध्यमातून विचारला आहे. घरी उपचार शक्य असणारेही अद्ययावत रुग्णालयातली जागा अडवतात आणि त्यामुळे खरी गरज असणाऱ्या सामान्यांना प्राणाला मुकावं लागतं', असं रश्मीने म्हटलं आहे.

" isDesktop="true" id="478022" >

अखेर खूप खटपट करून रश्मीच्या वडिलांना एका रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळाला. पण रुग्णाला आवश्यकता असलेली ऑक्सिजन लेव्हल ठेवण्याएवढी क्षमता तिथे नव्हती. मग पुन्हा चांगल्या रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेडसाठी वणवण सुरू झाली. अशा अवस्थेत तिचे वडील अखेर रुग्णालयात दाखल झाले, पण त्यांची Corona विरुद्धची लढाई 21 दिवस लढूनही ते हरले.

'बाबांना वेळेत ICU बेड मिळाला असता, तर आज ते आमच्यात असते. आम्ही आमचा बाप गमावला. ही वेळ कुणावरही येऊ शकते', असं म्हणत रश्मीने महाराष्ट्रातल्या खऱ्या Corona परिस्थितीची जाणीव करून दिली आहे आणि पुरेशी सोय असलेले सरकारी दावे किती आणि कसे फोल आहेत याचीही ही जाणीव आहे.

First published: