दिसपूर, 02 एप्रिल: सध्या देशातील विविध राज्यांत निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सध्या आसाममध्येही अनेक राजकीय नेते प्रचारासाठी येत आहेत. दरम्यानच्या काळात आसाममधील जनतेला एक दुर्मिळ क्षण पाहायाला मिळाला आहे. खरंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये काही लोकं एका हेलिकॉप्टरला धक्का मारत आहेत. यापूर्वी कधीही अशाप्रकारचं चित्र पाहिलं नाही, त्यामुळे हेलिकॉप्टरला धक्का दिल्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.
खरंतर संबंधित हेलिकॉप्टर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांचं असल्याच सांगितलं जात आहे. हे हेलिकॉप्टर ज्या हेलिपॅडवर उतरवण्यात आलं होतं. त्याठिकाणी दुसऱ्या एका महत्त्वाच्या नेत्याचं हेलिकॉप्टर उतरवलं जाणार होतं. त्यामुळे हेलिपॅड रिकामा करण्यासाठी काही लोकांनी हे हेलिकॉप्टर धक्का मारुन दुसऱ्या ठिकाणी नेलं आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात जोरात व्हायरल होतं असून अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.
कुमार गौरव नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यावेळी त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'दुसऱ्या एका महत्त्वाच्या व्यक्तीचं हेलिकॉप्टर खाली उतरवण्यासाठी आसामच्या मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर काही लोकांनी धक्का देवून हटवलं आहे. निवडणूकीनंतर खुर्चीसाठी अशाच प्रकारचं चित्र दिसण्याची संभाव्यता आहे.' यावर अनेक लोकांनी मजेदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
हे ही वाचा- आसाममध्ये मतदानानंतर भाजप उमेदवाराच्या कारमध्ये आढळलं EVM, 4 अधिकारी निलंबित
यावर प्रतिक्रिया देताना एका वापरकर्त्याने लिहिलं की, 'यामुळं भारतीय लोकांना जुगाडूही म्हटलं जातं.' अलिकडेच देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी आसाममध्ये प्रचार सभा घेतली होती. या सभेला अनेक लोकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.