Home /News /national /

आसाममध्ये मतदानानंतर भाजप उमेदवाराच्या कारमध्ये आढळलं EVM, 4 अधिकारी निलंबित

आसाममध्ये मतदानानंतर भाजप उमेदवाराच्या कारमध्ये आढळलं EVM, 4 अधिकारी निलंबित

आसामच्या (Assam) करीमगंज विधानसभा क्षेत्राच्या मतदान केंद्रावर भाजप आमदाराच्या कारमध्ये ईव्हीएम आढळून (EVM Found in BJP Candidates Car) आलं आहे. निवडणूक आयोगानं (Election Commission) या केंद्रावरील चार अधिकाऱ्यांचं निलंबनही केलं आहे

पुढे वाचा ...
    करीमगंज 02 एप्रिल : आसामच्या (Assam) करीमगंज विधानसभा क्षेत्राच्या मतदान केंद्रावर भाजप आमदाराच्या कारमध्ये ईव्हीएम आढळून (EVM Found in BJP Candidates Car) आल्यानं याठिकाणचं मतदान रद्द करण्यात आलं आहे. याशिवाय निवडणूक आयोगानं (Election Commission) या केंद्रावरील चार अधिकाऱ्यांचं निलंबनही केलं आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी निवडणुकीदरम्यान कारचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात वातावरण तापलं आहे. असा दावा केला जात आहे, की ही कार भाजपचे आमदार कृष्णेंदु पॉल यांच्या पत्नीची आहे. निवडणूक आयोगानं याबाबतचा सविस्तर अहवालही मागवला आहे. गुरुवारी संध्याकाळी आसामच्या करीमगंज भागात जेव्हा भाजप आमदार कृष्णेंदू पॉल यांच्या गाडीमध्ये निवडणूक अधिकारी ईव्हीएम घेऊन जात असल्याचं स्थानिकांनी पाहिल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. पॉल यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर असणाऱ्या महिंद्रा बोलेरोमध्ये ईव्हीएम सापडलं होतं. मतदानानंतर मशीनला स्ट्राँग रूममध्ये हलवले जात होते. जिल्हा निवडणूक अधिका-यांनी दाखल केलेल्या सुरुवातीच्या अहवालात असे सांगितले गेले आहे, की पोलिंग पार्टीला ते ज्या वाहनातून प्रवास करीत होते ते भाजपाच्या आमदारांचे आहे याची माहिती नव्हती. असं सांगितलं जात आहे, की ईव्हीएम मशीन इंदिरा एमवी शाळेच्या मतदान केंद्राचे अधिकारी स्ट्राँग रुमकडे घेऊन जात होतं. मात्र, रस्त्यातच त्यांची गाडी खराब झाली. यानंतर ते निवडणूक अधिकाऱ्यांसोबत संपर्क करू शकले नाहीत आणि शेजारुन जात असलेल्या गाडीकडे त्यांनी लिफ्ट मागितली. ही गाडी निवडणूक उमेदवार आणि पठारखंडीच्या आमदारांची होती. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी असं म्हटलं, आहे की ईव्हीएम सील होतं. या घटनेवरुन भाजपवर निशाणा साधत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या, की निवडणूक आयोगानं अशा तक्रारींवर कठोर कारवाई करायला हवी.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Assam Election, Assembly Election 2021, Election commission

    पुढील बातम्या