मराठी बातम्या /बातम्या /देश /देशातील वाढत्या लोकसंख्येबद्दल काय आहे संघांच्या मनात; मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं...

देशातील वाढत्या लोकसंख्येबद्दल काय आहे संघांच्या मनात; मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं...

यावेळी मोहन भागवतांनी या देशाचं उदाहरण दिलं आहे.

यावेळी मोहन भागवतांनी या देशाचं उदाहरण दिलं आहे.

यावेळी मोहन भागवतांनी या देशाचं उदाहरण दिलं आहे.

नवी दिल्ली, 14 जुलै : इस्रायल हा जगातील एक छोटा देश आहे. २० हजार चौरस किमी क्षेत्रात पसरलेल्या या देशाची लोकसंख्या (Population) फक्त 95 लाख आहे. तर आपल्या देशात 2 कोटी लोक एकट्या दिल्लीत राहतात. चहूबाजूला या मिडल ईस्ट देशाचे शत्रू आहे. मात्र यहूदी बहुल इस्त्रायलकडे कोणी वाईट (Mohan Bhagwat clearly said ) नजर टाकण्याची हिम्मत करू शकत नाही.

जो तशी हिम्मत करेल, त्याला अत्याधुनिक शस्त्रांनी संपवलं जातं. अशा परिस्थितीत जेव्हा आपल्या देशातील लोकसंख्येवर चर्चा सुरू आहे, इस्त्रायलचं उदाहरण प्रत्येक नागरिकाचा विचार बदलू शकतो. संपूर्ण जगाला या देशाच्या पॉवरबद्दल माहिती आहे. मग ते शेती असो वा टेक्नॉलॉजी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील या बाबतीत मोकळेपणाने इस्त्रायलचा उदाहरण देते आणि लोकसंख्या नियंत्रणावर जोर देते.

लोकसंख्येच्या नियंत्रणाबाबत चर्चा सुरू असताना, संघाचे प्रमुख मोहन भागवत स्पष्टपणे म्हणाले की, केवळ खाणं-पिणं आणि लोकसंख्या वाढवण्याचं काम प्राणीदेखील करतात. यात जो शक्तीशाली आहे, तोच स्वत:चा बचाव करू शकतो. परिणामी संघाचा संदेश स्पष्ट आहे की, देशाला इस्त्रायलप्रमाणे आपला प्रभाव आणि शक्ती वाढविण्याकडे लक्ष द्यायला हवं. यामध्ये जर लोकसंख्य़ा आडकाठी ठरत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्यापासून माघार घेऊ नये.

यापूर्वीही भागवत यांनी इस्त्रायलचं उदाहरण दिलं आहे. त्यावेळी भागवत म्हणाले होते की, 'आम्ही 70 वर्षात केलेली प्रगती इस्त्रायलसारख्या छोट्या देशाकडून शिकण्याची गरज आहे.' त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणासाठी कायद्याची गरज आहे का, अशी चर्चा सुरू असताना तर्काच्या आधारे युक्तिवाद केले जात आहेत. याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. त्यामुळे संघाची भूमिका जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

First published:
top videos

    Tags: Population, Rss mohan bhagwat