कोलकाता, 18 फेब्रुवारी: पश्चिम बंगालचे श्रम राज्यमंत्री झाकीर हुसैन (West Bengal minister Jakir Hossain) यांच्यावर हल्ला झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या क्रूड बॉम्ब हल्ल्यात हुसैन गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोर अद्यापही अज्ञात आहेत. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील निमतिता रेल्वे स्टेशनवर हा हल्ला झाला. मंत्री महोदयांव्यतिरिक्त या हल्ल्यामध्ये आणखी 14 जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.
हल्ल्यावेळी मंत्री हुसैन निमतिता स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर साधारण 10 वाजता कोलकाता जाणारी ट्रेन पकडण्यासाठी चालत जात होते. दरम्यान ज्यावेळी ही घटना घडली आहे, त्यावेळचा लाइव्ह व्हिडीओ समोर आला आहे. कोलकात्यात तृणमुल काँग्रेसची (Trinamool Congress) बैठक होती आणि बैठकीसाठी झाकिर हुसैन रवाना झाले होते. निमतिता स्टेशनच्या दिशेनं जात असताना त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला.
या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेले मंत्री झाकीर हुसैन यांच्यासह इतर जखमींना उपचारासाठी इस घटना में घायल हुए मंत्री जाकिर हुसैन समेत सभी घायलों को इलाज के लिए जंगीपूर महकमा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं आहे. शिवाय याठिकाणच्या अनेक गंभीर जखमींना बहरमपूर मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये देखील रेफर करण्यात आले आहे. तर मंत्र्यांसह एकूण चार लोकांना संध्या जंगीपूरहून कोलकातामध्ये जाण्यास रेफर करण्यात आले होते, त्यानुसार त्यांना कोलकाता याठिकाणी आणण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते हुसैन यांच्या हातावर आणि पायवर जखमा झाल्या आहेत. सध्या त्यांची परिस्थिती स्थीर आहे. त्यांना कार्डियाकची समस्या असल्याकारणाने इतर उपचारांसह त्यांना झोपेची गोळी देखील देण्यात आली आहे.
दरम्यान निमतिता रेल्वे स्टेशनवर झालेल्या या दुर्घटनेनंतर रेल्वेने कामरूप एक्सप्रेस, राधिकापुर एक्सप्रेस आणि हाट बाजार एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. या तिनही रेल्वेंना रामपूरहाटवरुन दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Attack on jakir hossain, Bomb Blast, Cm west bengal, Crime, Kolkata, Live video viral, West bengal