जाहिरात
मराठी बातम्या / देश / क्रूरतेचा VIDEO..! निरागस मुलं रडत राहिलं कुशीत, पोलीस करत होते बापाला मारहाण

क्रूरतेचा VIDEO..! निरागस मुलं रडत राहिलं कुशीत, पोलीस करत होते बापाला मारहाण

क्रूरतेचा VIDEO..! निरागस मुलं रडत राहिलं कुशीत, पोलीस करत होते बापाला मारहाण

पोलिसांच्या क्रूरतेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस एका व्यक्तीला लाठ्यांनी मारहाण करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

उत्तर प्रदेश, 10 डिसेंबर: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर ग्रामीण (rural Kanpur) भागातून पोलिसांच्या क्रूरतेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस एका व्यक्तीला लाठ्यांनी मारहाण करत आहे. ज्या व्यक्तीसोबत हे लाजिरवाणे कृत्य घडले आहे त्या व्यक्तीच्या कुशीत मुल रडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस एका व्यक्तीवर लाठीमार करत आहेत. तर 3 वर्षांचा निरागस मुल त्याच्या कुशीत रडत आहे. ज्या व्यक्तीला मारहाण केली जात आहे तो व्यक्ती पोलिसांना विनवणी करत आहे की, मुलाला लागेल. मारु नका. मात्र पोलीस ते मानायला तयार नव्हते.

जाहिरात

आता या व्हिडिओबाबत कानपूर पोलिसांचा खुलासाही समोर आला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, ज्या व्यक्तीला मारहाण केली जात आहे तो आणि त्याचा भाऊ हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत होते. हेही वाचा-  Nagpur: आईला मारहाण करणाऱ्या तरुणाला नियतीनं दिली शिक्षा; पोलीस ठाण्यातच झाला दुर्दैवी अंत सुमारे 50 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये पोलिसांची गाडी समोर उभी असून त्या व्यक्तीला तिथे मारहाण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र पोलीस धावत जाऊन त्याला मारत होते. ज्या व्यक्तीला मारहाण केली जात होती ती व्यक्ती मुलाला मारू नये म्हणून वारंवार पोलिसांकडे विनवणी करत आहे. मात्र पोलीस ऐकायला तयार नव्हते. पोलीस काय म्हणाले हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी या संपूर्ण घटनेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, रजनीश शुक्ला नावाच्या व्यक्तीनं रुग्णालयात आंदोलनादरम्यान गोंधळ घातला होता. व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती रजनीशचा भाऊ आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वारंवार समजावूनही तो मानण्यास तयार नव्हता.

डीएम आणि सीएमओही घटनास्थळी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे की, दोघांनीही त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तो मान्य करत नव्हता. रजनीश शुक्ला यांच्यावर यापूर्वीही गोंधळ घातल्याचा आरोप असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत त्यांना हटवण्याची जबाबदारी प्रशासन आणि पोलिसांची होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात