मराठी बातम्या /बातम्या /देश /West Bengal Elections 2021: ममतांना आणखी एक धक्का, जुन्या सहकाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश

West Bengal Elections 2021: ममतांना आणखी एक धक्का, जुन्या सहकाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections) पूर्वी बड्या नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश सुरु आहे. या यादीमध्ये शनिवारी आणखी एकाची भर पडली आहे.

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections) पूर्वी बड्या नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश सुरु आहे. या यादीमध्ये शनिवारी आणखी एकाची भर पडली आहे.

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections) पूर्वी बड्या नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश सुरु आहे. या यादीमध्ये शनिवारी आणखी एकाची भर पडली आहे.

कोलकाता, 6 मार्च : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2021) पूर्वी बड्या नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश सुरु आहे. या यादीमध्ये शनिवारी आणखी एकाची भर पडली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे जुने सहकारी दिनेश त्रिवेदी (Dinesh Trivedi) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J.P. Nadda) आणि केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goel) यांच्या उपस्थितीमध्ये त्रिवेदी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

दिनेश त्रिवेदी हे डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वे मंत्री होते. त्यांनी 12 फेब्रुवारी रोजी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्याचवेळी ते भाजपमध्ये प्रवेश करणार हे स्पष्ट झाले होते, ती औपचारिकता अखेर पूर्ण झाली आहे.

‘एका परिवाराची सेवा होते’

त्रिवेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल काँग्रेसवर (Trinamool Congress) नाव न घेता टीका केली आहे. ‘तिथे नेहमीच एका परिवाराची सेवा होते. माझ्यासाठी देश हा नेहमीच सर्वोच्च होता आणि नेहमी असेल. माझ्यासाठी देश सर्वोच्च नसता तर मी भाजपमध्ये प्रवेश केला नसता,’ असे त्रिवेदी यांनी स्पष्ट केले आहे.

Delhi: Dinesh Trivedi, who had resigned as TMC MP in Rajya Sabha on February 12th, joins BJP in the presence of the party's national president JP Nadda. Union Minister Piyush Goyal also present. pic.twitter.com/wCHlDbrcAz

— ANI (@ANI) March 6, 2021

मुकुल रॉय, शुभेंद्रू अधिकारी यांच्यापाठोपाठ दिनेश त्रिवेदी हे आणखी एक तृणमूल काँग्रेसचे जुने नेते भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी त्यांच्या पक्षाच्या 291 उमदेवारांची .यादी जाहीर केली आहे. ममता स्वत: नंदीग्राममधून निवडणूक लढवणार आहेत. ममतांना त्यांचे जुने सहकारी शुभेंद्रू अधिकारी आव्हान देण्याची शक्यता आहे.

( वाचा :  बाँब बनवताना स्फोट की कार्यकर्त्यांवर हल्ला? भाजपमधील 6 जण जखमी )

तृणमूलचा नंदीग्राम हा बालेलिल्ला इतकी वर्ष सांभाळणारे शुभेंद्रु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींना आव्हान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ममता यांना आपण किमान 50 हजार मतांनी हरवू असा विश्वास अधिकारी यांना आहे. मात्र भाजपनं अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

First published:
top videos

    Tags: Assembly Election 2021, BJP, Mamata banerjee, TMC, West bengal