मराठी बातम्या /बातम्या /देश /

'4 वेळा पक्ष बदलणारे मिथुन चक्रवर्ती मूळ नक्षलवादी होते,' तृणमूल काँग्रेसचा आरोप

'4 वेळा पक्ष बदलणारे मिथुन चक्रवर्ती मूळ नक्षलवादी होते,' तृणमूल काँग्रेसचा आरोप

अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मिथुन यांनी भाजपात प्रवेश करताच तृणमूल काँग्रेसनं त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

  • Published by:  News18 Desk

कोलकाता, 8 मार्च :  एकेकाळी तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार असलेले (Trinamool Congress Rajya Sabha MP) असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या रविवारी कोलकातामध्ये झालेल्या जाहीर सभेत मिथुन यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. मिथुन यांनी भाजपात प्रवेश करताच तृणमूल काँग्रेसनं त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार सौगत रॉय (Saugata Roy) यांनी मिथुन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'मिथुन हे आजचे नाही तर जुन्या काळातील स्टार आहेत. त्यांनी चार वेळा पक्ष बदलला आहे. ते मूळ नक्षलवादी होते. त्यानंतर ते मार्क्सवादी पार्टीत (CPM) गेले. पुन्हा त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आणि राज्यसभा खासदार बनले. भाजपाने धमकावल्यानंतर मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला,' असा आरोप रॉय यांनी केला.

'भाजपाने मिथुन चक्रवर्तींना ED च्या केसची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी राज्यसभा सदस्यत्व सोडले. आता ते भाजपामध्ये दाखल झाले आहेत. त्यांची कोणतीही विश्वासर्हता नाही. त्यांना काहीही सन्मान नाही. त्यांचा लोकांमध्ये प्रभाव देखील नाही,' असा दावा रॉय यांनी केला आहे.

Mithun Chakraborty is not a star of today. He is a star of yesteryears. He has changed parties four times. He was originally a Naxalite, then went to CPM, then he joined TMC & was made a Rajya Sabha MP: TMC MP Saugata Roy (1/2) https://t.co/KEY5R94sbS pic.twitter.com/UMDivXhnGE

— ANI (@ANI) March 7, 2021

( वाचा : ‘ममता बॅनर्जींना पाठिंबा दिला तर 50 लाख देऊ’ फारुख अब्दुल्ला यांना फोनवरुन ऑफर )

'मी खरा कोब्रा आहे. डंख मारला तर तुमचा फक्त फोटो शिल्लक राहील असा दावा मिथुन यांनी केला होता. "जो तुमचा हक्क हिरावून घेईल आम्ही त्यांच्या विरोधात संघर्ष करू.  बंगालमध्ये राहणारा प्रत्येक जण बंगाली आहे. मला गरिबांसाठी काम करायचं आहे, तेच माझं स्वप्न आहे.'' असे मिथुन चक्रवर्ती यांनी म्हंटले होते.

First published:

Tags: Assembly Election 2021, Mithun chakraborty, West bengal