• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • West Bengal: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागी लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर आता सीएम ममता बॅनर्जींचा फोटो

West Bengal: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागी लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर आता सीएम ममता बॅनर्जींचा फोटो

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerjee) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यामधील वाद थांबण्याचं नाव घेत नाही.

 • Share this:
  कलकत्ता, 4 जून : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerjee) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्यामधील वाद थांबण्याचं नाव घेत नाही. आतापर्यंत वॅक्सीनेशन सर्टिफिकेटवर (Vaccination Certificate) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असतो. मात्र आता वॅक्सीनेशन कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात 18-44 वयाच्या नागरिकांच्या वॅक्सीनेशन सर्टिफिकेटवर बंगालमध्ये पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी याचा फोटो लावला जात आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सातत्याने केंद्र सरकारच्या वॅक्सीन नीतीवर सवाल उपस्थित करीत आहे. दरम्यान सर्व नागरिकांना वॅक्सीन देण्याची मागणी करीत आहे. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व मुख्य मंदिरातील पुजाऱ्यांना लस घेण्याचे निर्देश दिले आहेत. ( Vaccination Of Priests) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या टप्प्यात बंगालमध्ये सीएम ममता बॅनर्जी यांचा फोटो लावला जाईल. वॅक्सीनेशन सर्टिफिकेटवर सीएम ममता बॅनर्जींचा फोटो विधानसभा निवडणुकीदरम्यान वॅक्सीनेशनच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोबाबात टीएमसीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तृणमूलने आपल्या तक्रारीत दिले होते की, कोविड-१९ च्या लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणं हे निवडणुकीच्या आचार संहितेचं उल्लंघन आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की, पश्चिम बंगाल आणि अन्य निवडणूक राज्यात को-विन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कोविड-१९ लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असणं आदर्श आचार संहितेचं उल्लघन असल्याचं सांगितलं होतं. हे ही वाचा-भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट पसरण्यामागं 'हे' होतं महत्त्वाचं कारण - WHO नागरिकांना निशुल्क लस देतेय सरकार बंगाल सरकार नागरिकांना निःशुल्क लस देत आहे. ममता बनर्जींनी सांगितलं होतं की, प्रत्येक लशीसाठी 600 ते 1200 रुपये खर्च होत आहेत. 1.4 कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहेत. जर 18 वयापर्यंत पाहिलं तर बंगालमध्ये 8 कोटी लोक राहतात. यासाठी राज्याकडून केंद्राकडे लसीकरणाची मागणी केली जात आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: