मराठी बातम्या /बातम्या /देश /West Bengal assembly elections 2021: संतापलेल्या केंद्रीय मंत्र्याने लगावली एकाला थप्पड?

West Bengal assembly elections 2021: संतापलेल्या केंद्रीय मंत्र्याने लगावली एकाला थप्पड?

पश्चिम बंगालमधील (West Bengal) टॉलीगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो (Babul Supriyo) यांच्यावर एका व्यक्तीला थप्पड लगावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कोलकाता, 30 मार्च : पश्चिम बंगालमधील (West Bengal) टॉलीगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो (Babul Supriyo) यांच्यावर एका व्यक्तीला थप्पड लगावल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपा कार्यलयात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल (Viral) झाला आहे. त्यानंतर आपण त्या व्यक्तीला थप्पड मारली नाही, फक्त थप्पड मारण्याचा अभिनय केला, असा दावा सुप्रियो यांनी केला आहे.

टॉलीगंज विधानसभा मतदारसंघातील एका भाजपा कार्यलायत ही सर्व घटना घडली, केंद्रीय पर्यावरण आणि जलवायू राज्यमंत्री बाबूल सुप्रियो त्या ठिकाणी डोलजात्रा उत्सवामध्ये भाग घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी, 'टीव्ही कॅमेऱ्याच्या समोर नेहमी प्रतिक्रिया दिल्यापेक्षा आपल्या मतदरासंघात प्रचाराला सुरुवात करा,' अशी सूचना एक व्यक्ती त्यांना सतत देत होता. त्यामुळे संतापलेल्या सुप्रियो यांनी त्याला थप्पड लगावली असा आरोप आहे.

तृणमूल काँग्रेसने या प्रकरणावर भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. 'ज्या व्यक्तीला सुप्रियो यांनी थप्पड मारली ती व्यक्ती तृणमूल काँग्रेसची बाहेरची व्यक्ती होती की एक विभीषण (भाजपा सदस्य) होती याची माहिती पक्षाला हवी आहे,' अशी मागणी तृणमुलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी केली.

(हे वाचा : BJP कार्यकर्त्याच्या आईच्या मृत्यूनंतर अमित शहा-ममता बॅनर्जी आमने-सामने )

पश्चिम बंगाल विधानसभेसाठी एकूण 8 टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान 1 एप्रिल रोजी होणार आहे. 27 मार्च रोजी झालेल्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात 84.63 टक्के मतदान झाले होते. शनिवारी ज्या 30 विधानसभा मतदारसंघात मतदान झाले त्यामुळे पुरुलिया, बाकुंरा, झारग्राम पूर्व मेदिनीपूर आणि पश्मिम मेदीनीपूर जिल्ह्यातील मतदारसंघाचा समावेश होता. काही किरकोळ घटना वगळता हे मतदान शांततेत झाले अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे.

First published:

Tags: Accusation, Assembly Election 2021, BJP, India, West bengal