मराठी बातम्या /बातम्या /देश /W. Bengal Assembly Election 2021 Exit Poll : ममता दीदीं पुढे मोदींचं मॅजिक फेल, तृणमूल पुन्हा एकदा किंग

W. Bengal Assembly Election 2021 Exit Poll : ममता दीदीं पुढे मोदींचं मॅजिक फेल, तृणमूल पुन्हा एकदा किंग

ममता दीदींच्या तृणमूलला एग्जिट पोलमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ममता दीदींच्या तृणमूलला एग्जिट पोलमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ममता दीदींच्या तृणमूलला एग्जिट पोलमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नवी दिल्ली, 29 एप्रिल : West Bengal Assembly Election 2021 Exit Poll Results: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे सर्व देशाचं लक्ष आहे. आज आलेल्या एग्जिट पोलच्या निकालामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून बरेच प्रयत्न करीत होती. अमित शहा, नरेंद्र मोदींपासून अनेक नेते या निवडणुकीत सामील झाले होते. कोरोनाचा कहर असतानाही पश्चिम बंगालमध्ये मात्र रॅली, प्रचाराचं वातावरण होतं. मात्र तरीही पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी पुन्हा एकदा क्वीन ठरल्या आहेत. ममता दीदींच्या तृणमृलला एग्जिट पोलमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या एग्जिट पोलमध्ये ममता दीदींच्या तृणमूलला 152 ते 164 जागा मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर भाजपला केवळ 109-121 जागा मिळाल्या आहेत. कोणत्याही पक्षाला विजयासाठी कमीत कमी 148 जागांची गरज आहे. त्यामुळे एग्जिट पोलच्या निकालानुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता दीदींचा विजय झाल्याचं समोर येत आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जींच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोघांसाठी ही निवडणूक अग्निपरीक्षेपेक्षा कमी नव्हती. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी (29 एप्रिल) सायंकाळी सहा वाजता पार पडलं. पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झालं. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्यात अनेक भागात छोट्या-मोठ्या हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहे. विधानसभेच्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्यात 35 जागांसाठी 11,860 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. यामध्ये 11-11 जागा मुर्शीदाबाद आणि बीरभूम जिल्ह्यात तर सहा जागा मालदा आणि सात जागा कोलकाताच्या उत्तरेकडील आहेत. बंगालमध्ये पहिल्या टप्प्याची निवडणूक 27 मार्च रोजी सुरू झाली होती. त्याशिवाय 2 मे (रविवारी) रोजी मतमोजणी होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागांसाठी निवडणूक पार पडली. यात कोणत्याही पक्षाला विजयासाठी कमीत कमी 148 जागांची गरज आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ 30 मे 2021 रोजी पूर्ण होत आहे. अशात 30 मेपासून प्रामुख्याने विधानसभा आणि नवीन सरकार गठीत करण्याची प्रक्रिया सूरू होईल. पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 विधानसभेच्या जागा आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ममता बॅनर्जी येथे मुख्यमंत्रिपद सांभाळत आहेत.

हे ही वाचा-मृतदेहांसोबत मोर्चा काढा' Viral टेपमधील आवाज ममतांचाच असल्याचा भाजपाचा दावा

ममता यांनी मतमोजणीपूर्वी बोलवली उमेदवारांची बैठक

आठव्या टप्प्यात संपन्न झालेली पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया आता समाप्त जाली आहे. निवडणूक संपल्यानंतर ममता बॅनर्जीने तृणमूल काँग्रेसचे नेते आणि प्रत्येक जागेवरील उमेदवारांची बैठक बोलावली. 2 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी ममता दीदींनीही बैठक बोलावली आहे.

West Bengal Assembly Election 2021 Exit Poll Results

तृणमूल काँग्रेस - 152-164

भाजप-109-121

काँग्रेस - 14-15

First published:

Tags: Assembly Election 2021, West bangal