जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'मृतदेहांसोबत मोर्चा काढा' Viral टेपमधील 'तो' आवाज ममता दीदींचा असल्याचा भाजपाचा दावा

'मृतदेहांसोबत मोर्चा काढा' Viral टेपमधील 'तो' आवाज ममता दीदींचा असल्याचा भाजपाचा दावा

'मृतदेहांसोबत मोर्चा काढा' Viral टेपमधील 'तो' आवाज ममता दीदींचा असल्याचा भाजपाचा दावा

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची एक कथित ऑडिओ टेप सध्या व्हायरल (Audio Tape) झाली आहे. या ऑडिओ टेपमधील आवाज ममता बॅनर्जी यांचाच असल्याचा दावा भाजपानं केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 17 एप्रिल : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) निमित्तानं भाजपा (BJP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यातील वाद सध्या शिगेला पोहचला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची एक कथित ऑडिओ टेप सध्या व्हायरल (Audio Tape Viral) झाली आहे. या ऑडिओ टेपमधील आवाज ममता बॅनर्जी यांचाच असल्याचा दावा भाजपानं केला आहे. टेपमध्ये काय आहे? भारतीय जनता पक्षाच्या IT सेलचे प्रमुख अमित मालविय (Amit Malviya) यांनी केलेल्या दाव्यानुसार CISF च्या गोळीबारात मारले गेलेल्या चार लोकांच्या मृतदेहांसोबत मोर्चा काढा, असा आदेश ममता बॅनर्जी यांनी सीतलकूची विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ राय यांना दिला आहे. मालविय यांनी याबाबत एक ट्विट करुन हा दावा केलाय. ममता बॅनर्जी यांना पोलीस अधिकाऱ्यांना फसवायचं आहे. त्या खोट्या अफवा पसरवून अल्पसंख्याकांना आपल्याकडं ओढण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा मालविय यांनी केला आहे. कुचबिहार जिल्ह्यातील सीतलकूची मतदान केंद्रावर 10 एप्रिल रोजी झालेल्या चौथ्या टप्प्यातील मतदानात स्थानिक लोकांनी केलेल्या हल्ल्यानंतर केंद्रीय सुरक्षा दलानं गोळीबार केला. या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पार्थ यांच्याशी केलेल्या संभाषणाची ही ऑडिओ टेप असल्याचा भाजपाचा दावा आहे. “घाबरु नका. तुम्ही दुसऱ्या दिवशी मृतदेहांसोबत मोर्चा काढण्याचा बंदोबस्त करा. वकिलांशी चर्चा करा आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल करा. या प्रकरणात एसपी किंवा आयसी कुणीही वाचता कामा नये’ असं ममता बॅनर्जी पार्थ राय यांना आदेश देत असल्याचं या ऑडिओ टेपमध्ये ऐकू येत आहे.

जाहिरात

तृणमूल काँग्रेसनं मात्र भाजपाचा हा आरोप फेटाळला आहे. या प्रकारची कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा पक्षानं केला आहे. तर या प्रकरणात निवडणूक आयोगाकडं तक्रार करणार असल्याचं भाजपानं स्पष्ट केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात