Assembly Election : अभिनेत्यांमध्ये जुंपली; भाजपच्या 'कोब्र्याचा' काँग्रेसकडून समाचार

चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले हे अभिनेते आता एकमेकांसमोर ठाकले आहेत

चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले हे अभिनेते आता एकमेकांसमोर ठाकले आहेत

  • Share this:
    नागपूर, 8 मार्च : ज्येष्ठ चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी औपचारिकपणे भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. कोलकातामधील ब्रिगेड परेड मैदानात आयोजित भाजपाच्या महासभेत मिथुन चक्रवर्ती स्टेजवर उपस्थित होते. सभेत बोलताना मिथुन यांनी त्यांच्या डायलॉगनी लोकांचं चांगलंच मनोरंजन केलं. मिथुन यांनी यावेळी एकापाठोपाठ एक असे अनेक डायलॉग ऐकवले. या सभेतून त्यांनी सांगितले की, ''मी खरा कोब्रा आहे. डंख मारला तर तुमचा फक्त फोटो उरेल.' ते यावेळी पुढे म्हणाले की, 'मला बंगाली असण्याचा अभिमान आहे. माझे डायलॉग तुम्हाला आवडतात याची मला कल्पना आहे.'' हे ही वाचा-मी मित्रांसाठी काम करतो', मोदींनी विरोधकांच्या टीकेला दिलं जोरदार प्रत्युत्तर त्यांच्या या डायलॉगबाजीनंतर एकेकाळी भाजपत असलेले आणि 2019 मध्ये काँग्रेसमध्ये सामील झालेले शत्रुघ्न सिन्हा यांनी मिथुन चक्रवर्तींना खोचक सल्ला दिला आहे. यावेळी शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश केला हे चांगलं आहे. मात्र पहिल्याच रॅलीत साप, विंचू, कोब्रा अशी तीव्र भाषा वापरायला नको. मिथुन हे माझे जवळचे  मित्र आहेत. आम्ही अनेक अनेक सिनेमात सोबत काम केलं. त्यांचं लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. मात्र पहिल्याच रॅलीत त्यांनी साप, विंचू आणि कोब्रा अशा भाषेचा वापर केला. सभेत राजकीय मुद्दे मांडले असले तर बरं झालं असतं. त्यामुळे याचा भाजपला खूप फायदा होईल, असं तुर्तास दिसत नाही. कालची रॅली चांगली झाली, परंतू ममता बॅनर्जींची रॅली यापेक्षा मोठी होती. ममता बॅनर्जी या मजबूत आहेत. त्यांना हलविणं एवढं सोपं होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅलीज महत्त्वाचे मुद्दे मांडले नाहीत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख केला असता तर आणखी चांगलं झालं असतं. मिथुन यांच्यामुळेही भाजपची हिम्मत वाढली आहे. ममताच्या विरोधात मिथुन यांनी कोब्राचा उल्लेख करायला नको होता. केवळ चित्रपटसृष्टीतच नाही तर नेत्यांवरसुद्धा ईडीसारख्या एजन्सीचा वापर केला जात आहे, हे चांगलं नाही, असं म्हणत नेमक्या शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला.
    Published by:Meenal Gangurde
    First published: