Assembly Election 2021 : कलकत्ता, 7 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Election 2021) रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये जनतेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी बंगालमधील जनतेला भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं. बंगाल भयमुक्त करण्यासाठी जनतेने भाजपला मत देऊन विजयी करावं, असं मोदींनी आवाहन केलं.
काँग्रेस नेते राहुल गांधीं यांचं नाव न घेता मोदींनी त्यांनाही प्रत्युत्तर दिले. भाषणादरम्यान ते म्हणाले की, आजकाल तर आमचे विरोधकही म्हणतात की, मी मित्रांसाठी काम करतो. आपणा सर्वांना माहीत आहे की, जेथे आपलं बालपण जातं, जिथं लहान वयात आण मस्ती करतो, खेळता..ज्यांच्यासोबत शाळेत एकत्र शिकतो..त्यांच्यासोबतचे नाते आयुष्यभराचे असते. माझं बालपणदेखील गरीबीत गेलं आहे, त्यामुळे माझ्या मित्रांचं दु:ख काय आहे हे मला कळतंय. ते देशातील कोणत्याही कोपऱ्यात असले तरी ते माझे मित्र आहेत. त्यामुळे मी मित्रांसाठी काम करतो आणि नेहमी त्यांच्यासाठी काम करीत राहीन, असं म्हणत मोदींनी पहिल्यांदा त्यांच्या विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Addressing a massive BJP rally in Kolkata. https://t.co/VqWeGkKY9H
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2021
याशिवाय मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर ताशेरे ओढले. ममता बॅनर्जी यांनी राज्याची लूटमार केली, यामुळे भाजपला लोकांचं प्रेम मिळत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.
आणि काय म्हणाले मोदी...
'बंगालच्या लोकांनी ममतादीदी यांच्यावर विश्वास ठेवला होता. पण ममतादीदी आणि त्यांच्या लोकांनी पश्चिम बंगालचा विकास केला नाही, लोकांचा विश्वासघात केला. बंगालचा अपमान केला आहे. महिला आणि मुलींवर अत्याचार केले. ती लोकं कधीच लोकांचा विश्वास पुन्हा जिंकू शकत नाही, असा टोला मोदींना लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, BJP, Cm west bengal, Modi government, Narendra modi, Pm modi speech, Pm narendra modi Rally