अभिनंदन भारतात परतल्यानंतर होणार चौकशी, द्यावी लागणार ही सत्वपरीक्षा

अभिनंदन भारतात परतल्यानंतर होणार चौकशी, द्यावी लागणार ही सत्वपरीक्षा

भारतात आल्यानंतर अभिनंदन यांची कसून चौकशी करण्यात येणार आहेत. न्यूज18 शी बोलताना एका उच्च आयपीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अभिनंदन भारतात परतल्यानंतर त्यांना कठोर वागणूक दिली जाईल. त्यांची कसून चौकशी केली जाईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 मार्च : भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना अखेर भारताकडे सुपूर्द करण्यात आलं. आज वाघा बार्डरवरून अभिनंदन वर्तमान भारतीय वायू दलाचे अधिकारी जेडी कुरियन यांच्यासोबत भारतात परतले. मोठ्या जल्लोषात त्यांचं वाघा बॉर्डरवर स्वागत करण्यात आलं. आपल्या देशाच्या या वाघाला सलाम करण्यासाठी भारतीयांनी सीमेवर मोठी गर्दी केली होती.

नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानचं जेट F-16 लढाऊ विमानं पाडताना भारताचं मिग-21 हे विमान पाकिस्तानच्या भूमीत पडलं. यावेळी जखमी अवस्थेतील अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. मात्र भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आलेल्या दबावानंतर पाकिस्ताननं अभिनंदन याची सुटका करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज अभिनंदन यांची सुटका झाल्यानं संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण आहे.

पण भारतात आल्यानंतर अभिनंदन यांची कसून चौकशी करण्यात येणार आहेत. न्यूज18 शी बोलताना एका उच्च आयपीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अभिनंदन भारतात परतल्यानंतर त्यांना कठोर वागणूक दिली जाईल. त्यांची कसून चौकशी केली जाईल. अभिनंदन भारतात परतल्यानंतर त्यांना कशा पद्धतीची वागणूक दिली जाईल यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला असता आयपीएस अधिकारी म्हणाले की, ...

Live: 'टायगर इज बॅक', विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर दाखल...

- अभिनंदनच्या शौर्याचं स्वागत केलं जाईल, त्यांचा गौरव केला जाईल. लष्करी नियमानुसार, एखाद्या युद्ध कैद्याप्रमाणे त्यांची कसून चौकशी करण्यात येईल.

- अभिनंदन यांनी दाखवलेल्या शौर्याचा भारतीय लष्कराला अभिमान आहे. पण एकदा का आपला जवान शत्रूच्या हाती लागतो तेव्हा तो कोणीही असला तरी त्याची कसून चौकशी करण्यात येते.

- अभिनंदन यांना भारतात आणण्यात आलं आहे. त्यानंतर आता त्यांना वायुदलाकडे सुपुर्द करण्यात येईल आणि नंतर त्यांच्या सर्व वैद्यकीय चाचण्या केल्या जातील.

- अभिनंदन यांची प्रकृती उत्तम आहे की त्यांना काही इजा झाली आहे, हे पाहण्यासाठी त्यांची संपूर्ण वैद्यकीय चाचणी केली जाईल.

- पाकिस्तानकडून त्यांच्या शरीरात एखादी चिप तर लपण्यात आली नाही ना याचीदेखील तपासणी करण्यात येईल.

- लष्करी कायद्यानुसार, अभिनंदन यांची मनोवैज्ञानिक चाचणीदेखील करण्यात येईल.

- शत्रू देशामध्ये अभिनंदन हे तब्बल 2 दिवस होते. तेदेखील एकटे. यावेळी त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली. त्यांना मानसिक त्रास देण्यात आला. याचा त्यांच्या मनाला मोठा धक्का बसला असेल. त्यामुळे त्यांची मनोवैज्ञानिक चाचणी करण्यात येईल.

- शत्रू देशाकडे असताना त्यांना कोणते प्रश्न विचारण्यात आले. शत्रू देशाकडून त्यांना गुप्तहेर म्हणून तर पाठवण्यात आलं नाही ना, याचीदेखील कसून चौकशी करण्यात येईल.

- अभिनंदन यांनी आपल्या देशासंबंधी कोणतीही माहिती शत्रू देशाला पुरवली नसली तरीदेखील निमयांनुसार त्यांची कसून चौकशी करावी लागणार असल्याचं आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं.

- दरम्यान, ही एक चौकशी नाही तर त्यांना फक्त काही प्रश्न विचारले जातील अशीदेखील माहिती आयपीएस अधिकाऱ्यांनी दिली. तर त्यांना कोणतीही वाईट वागणूक दिली जाणार नाही असंही ते म्हणाले.

पुन्हा विमान उडवण्यासाठी अभिनंदन यांना लागतील 3 महिने, कारण...

विंग कमांडर अभिनंदन यांना भारतात आल्यानंतर विमान उडवण्याकरता किमान 3 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो. त्यासाठी काही नियम आहेत. हवाई दलाच्या नियमानुसार विंग कमांडर अभिनंदन यांचं मेडिकल चेकअप करण्यात येईल. विमानातून उडी मारताना मणक्याला मार लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सुरुवातीला त्याबाबत मेडिकल चेकअप केलं जाईल. या सर्व वैद्यकीय चाचण्यांमध्ये अभिनंदन पास झाले की त्यानंतर त्यांना विमान उडवण्यासाठी परवानगी दिली जाईल.

पण, वैद्यकीय चाचणीमध्ये कमी पडल्यास अभिनंदन यांची दुसऱ्या पदावर किंवा विमानावर बदली केली जाईल. भारतीय हवाई दलाच्या नियमांनुसार या साऱ्या गोष्टी पार पाडल्या जातात.

VIDEO: तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा ठेवते, शहीद निनाद यांची पत्नी...!

First published: March 1, 2019, 5:29 PM IST

ताज्या बातम्या