नवी दिल्ली, 01 मार्च : भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना अखेर भारताकडे सुपूर्द करण्यात आलं. आज वाघा बार्डरवरून अभिनंदन वर्तमान भारतीय वायू दलाचे अधिकारी जेडी कुरियन यांच्यासोबत भारतात परतले आहेत. पण यावेळी वाघा बॉर्डवर होणारा ‘बीटिंग द रिट्रीट’ हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. भारत आणि पाकिस्तानची सीमा असलेल्या वाघा बॉर्डवरून अखेर भारताचा वाघ मायदेशी परतला आहे. मोठ्या संख्येनं पर्यटक आणि भारतीयांनी वाघा बॉर्डर परिसरात अभिनंदन यांचं स्वागत करण्यासाठी गर्दी केली आहे. अभिनंदन यांच्या गाड्यांचा ताफा बॉर्डरच्या आतमध्ये येताच ढोल ताशांचा गजर सुरू झाला. मोठ्या प्रमाणात जल्लोष हा सध्या वाघा बॉर्डरवर पाहण्यात येत आहे.
Visuals from Attari-Wagah border; Wing Commander #AbhinandanVarthaman to be received by a team of Indian Air Force. pic.twitter.com/C4wv14AEAd
— ANI (@ANI) March 1, 2019
Pakistan: Visuals from Wagah in Lahore; IAF Wing Commander #AbhinandanVarthaman will soon be handed over to the Indian Air Force at Attari-Wagah border pic.twitter.com/xEPghVgNzi
— ANI (@ANI) March 1, 2019
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, विंग कमांडर अभिनंदन यांची गाडी वाघा बॉर्डमधून भारताच्या हद्दीत आली आहे. त्यावेळी वाघा बॉर्डवर ‘बीटिंग द रिट्रीट’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. पण सुरक्षेच्या दृष्टीने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यामुळे कोणत्याही नागरिकांना यावेळी वाघा बॉर्डरवर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. दरम्यान, अभिनंदन यांना भारतात आणण्यासाठी सगळ्या महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना भारतात परत आणण्यात आलं. त्याचबरोबर आपल्या मुलाला आणि देशाच्या या वीरपुत्राला पाहण्यासाठी अभिनंदनचे आई-वडील अमृतसरला दाखल झाले असल्याची माहितीही देण्यात आली आहे. विंग कमांडर यांची पाकिस्तानकडून होणार सुटका नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानचं जेट F-16 लढाऊ विमानं पाडताना भारताचं मिग-21 हे विमान पाकिस्तानच्या भूमीत पडलं. यावेळी जखमी अवस्थेतील अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. मात्र भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आलेल्या दबावानंतर पाकिस्ताननं अभिनंदन याची सुटका करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज अभिनंदन यांची सुटका होणार असल्यानं संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण आहे. कोण आहेत विंग कमांडर अभिनंदन ? - 19 जून 2004 मध्ये भारतीय वायूसेनेत दाखल - मिग-21 बिसॉन लढाऊ विमानाचे वैमानिक - अभिनंदन यांचे वडील एस. वर्धमान निवृत्त लष्करी अधिकारी - एस.वर्धमान यांनी एअर मार्शलपद भूषवलं काय आहे जीनिव्हा करार? - सैनिक पकडलेल्या क्षणी करार लागू होतो - युद्धकैदी कुणाला म्हणावं आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचे आंतरराष्ट्रीय नियम लागू - युद्धकैदयाला धर्म,जात, जन्माबद्दल विचारता येत नाही - नाव, सैन्यातलं पद, नंबर आणि युनिटबद्दल चौकशी शक्य - युद्धकैदी सैनिकाची जबरदस्तीनं चौकशी करता येत नाही - युद्धकैद्याला खाण्यापिण्याची आणि वैद्यकीय सुविधा देणं अनिवार्य - युद्धकैद्याला गुन्हेगार म्हणून वागणूक देता येत नाही - कैद्यांना कायदेशीर मदत देणं बंधनकारक - युद्धकैद्यांवर खटला चालवला जाऊ शकतो - युद्ध संपल्यानंतर युद्धकैद्यांना मायदेशाच्या हवाली करणं बंधनकारक - दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धकैद्यांचा मुद्दा गाजल्यानंतर 1949 साली 194 देशांकडून कराराला मान्यता तुम्ही कितीही कणखर असाल, पण हा VIDEO पाहिल्यानंतर डोळ्यात नक्कीच अश्रू येतील