Home /News /national /

Weather Updates: मान्सून लवकरच केरळमध्ये, काय सांगतो IMD चा पावसाविषयीचा नवा अंदाज

Weather Updates: मान्सून लवकरच केरळमध्ये, काय सांगतो IMD चा पावसाविषयीचा नवा अंदाज

Weather Updates: भारत हवामान विभाग (आयएमडी) च्या मते, दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

    नवी दिल्ली, 27 मे: नैऋत्य मान्सून (Southwest Monsoon) श्रीलंकेला (Sri Lanka) पोहोचला असून तो आता केरळ किनाऱ्याच्या (Kerala Coast) दिशेनं जात आहे. (Meteorological Department) भारत हवामान विभाग (आयएमडी) च्या मते, दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. पुढच्या 48 तासांत मालदीव लक्षद्विपच्या आसपासच्या भागात पोहोचण्याची अपेक्षा आहे. आयएमडीने पुढील दोन दिवसांत लक्षद्विप आणि केरळमध्ये व्यापक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीने आपल्या अहवालात म्हटलं आहे की, नैऋत्य मान्सून केरळच्या दिशेनं वाटचाल करत असताना त्याचे पूर्णपणे परीक्षण केलं जात आहे. साधारणत: पावसाळा केरळमध्ये 1 जून रोजी आला आहे, आता 4 दिवसांपूर्वी हे आगमन अपेक्षित आहे. हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, काही दिवसांपूर्वी, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ असानी या चक्रीवादळामुळे नैऋत्य मान्सूनला वेग आला आहे. हवामानशास्त्रीय विभागाने पुढील 3 ते 4 दिवस दिल्लीच्या तापमानात थोडी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यावेळी तापमान 41 डिग्री सेल्सियस पर्यंत जाऊ शकते. झारखंड, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या मते, जम्मू -काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा येथेही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार आणि झारखंडमध्ये उकाड्यापासून सुटका हवामानशास्त्रीय विभागाच्या म्हणण्यानुसार, झारखंडमध्ये 27 मे ते 30 मे या कालावधीत वेगवेगळ्या भागात पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात बिहारला मुसळधार पाऊस पडला आणि आता पुन्हा एकदा 28 मे ते 30 मे दरम्यान मुसळधार पाऊस पडला आहे. बिहारच्या उत्तर भागांत सर्वाधिक पाऊस पडेल. इतर भागांमध्ये कमी पाऊस असू शकतो. पूर्व उत्तर प्रदेशात अंदाजे हलका पाऊस हवामान विभागानं उत्तर प्रदेशातील 10 जिल्ह्यांमध्ये 28 मे पर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. तर 20 हून अधिक जिल्ह्यांना जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. हवामान विभागाच्या मते, देवरिया, बलरामपूर, सिद्धार्थनगर, संत कबीर नगर, गोरखपूर, महाराजगंज, कुशीनगर, सोनभद्र, चंदौली, वाराणसी, सीतापूर, बहराइच, कौशांबी, चित्रकूट, रायबरेली, अमेठी, बांदा, फतेहपूर, हमीरपूर आणि महोबामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Kerala, Rain (Taxonomy Subject)

    पुढील बातम्या