मुंबई 24 ऑक्टोबर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला थायलंडने सितरंग असं नाव दिलं आहे. सोमवारी पहाटे 3 वाजून 17 मिनिटांनी हे वादळ सागर बेटाच्या दक्षिणेस सुमारे 520 किमी अंतरावर आणि बांगलादेशातील बारिसालपासून 670 किमी नैऋत्येस होतं. पुढील 12 तासांत ते उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याची आणि तीव्र चक्रीवादळात बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवारी देशाच्या काही किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय किनारपट्ट्यांच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा महाराष्ट्रात परिणाम दिसणार नाही. या चक्रीवादळाचा प्रभाव प्रामुख्याने ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात पाहायला मिळू शकतो. चक्रीवादळामुळे भारतीय किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान मागच्या चार महिन्यांपासून राज्यात मान्सूनने धुमाकूळ घातला होता. परतीच्या पावसानेही राज्यातील विविध भागात धुमाकूळ घातला होता. मान्सूनचा परतीचा प्रवास थांबणार अशी माहिती हवामान खात्याने दिली होती. अखेर 22 ऑक्टोबरपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. दरम्यान राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.
Monsson Rain Weather Update : खुशखबर! मान्सूनचा परतीचा प्रवास संपला, हवामान खात्याची घोषणा
संपूर्ण राज्यातून ओलावा कमी होणे म्हणजेच आपल्या राज्यातून 2022 च्या मान्सूनच्या समाप्तीचे प्रतीक देण्यात आले आहेत. अशी घोषणा रविवारी हवामान विभागाने केली. त्यामुळे मुंबई, पुणेसह संपूर्ण राज्यात (दि.28) ऑक्टोबरपर्यंत सर्वत्र कोरडे वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अरबी समुद्रातील बाष्पामुळे मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सात ते आठ दिवसांनी लांबला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain, Weather forecast