लखनऊ, 16 सप्टेंबर : उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये जोरदार पावसाने मोठी दुर्घटना घडली आहे. मागच्या दोन दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील काही भागात जोरदार पाऊस होत आहे. (Wall Collapse Uttar Pradesh) यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अशातच लखनऊमध्ये लष्कराच्या छावणीची भिंत कोसळून 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज पहाटे(दि.16) शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
लष्करानं दिलेल्या माहितीनुसार, भिंत कोसळल्यानंतर चिखलाखालून एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे. मुसळधार पावसामुळे लष्करी छावणीच्या सीमेवरची ही भिंत कोसळली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्वजण बांधकाम मजूर होते, असे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
UP | Nine people dead and 2 injured after a wall collapsed due to heavy rain in Lucknow. The incident took place in Dilkusha under Cantt: Home Department pic.twitter.com/Kxmml42KBe
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 16, 2022
हे ही वाचा : Mumbai Pune Rain Alert : मुंबई, पुण्यात पावसाने दैना, 6 तास कोसळधार, कोकणासह अन्य भागात IMD कडून इशारा
लष्कर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि.16) शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यानंतर तातडीने पहाटे 3 वाजता लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले. लखनऊच्या दिलकुशा भागात लष्करी छावणी आहे. काही बांधकाम मजूर छावणीच्या भिंतीला लागून झोपड्यांमध्ये राहात होते. पावसामुळे ही भिंत थेट या झोपड्यांवरच कोसळल्यामुळे ही दुर्घटना झाली. जवानांनी ९ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीसह देशातील अनेक राज्यात जोरदार, मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीला लागून असलेल्या वायव्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस पुन्हा सक्रिय झाला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
हे ही वाचा : एसटी बसच्या पत्र्याचा धक्का लागला अन्..; पोलीस भरतीसाठी व्यायाम करताना 2 तरुणांसोबत भयंकर दुर्घटना
उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवरही सध्या जोरदार पाऊस असून या भागाला वादळाचा फटका बसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 24 तास देशातील अनेक भागत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.दरम्यान, लखनौमध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. या पार्श्वभूमीवर लखनौमधील शाळांमधल्या बारावीपर्यंतच्या वर्गांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Major accident, Rain updates, Rainfall, Uttar pradesh, Uttar pradesh news