कोईम्बतूर, 22 फेब्रुवारी : पशू-पक्ष्यांसोबत केली जाणारी क्रूरता (cruelty on animals)अनेकदा आपण ऐकतो-पाहतो. ती थांबवण्यासाठी अनेक कायदेही अस्तित्वात आहेत. मात्र तरीही तिला पूर्णपणे रोखता आलेलं नाही.
आता तामिळनाडूमधून (Tamilnadu) अशाच एका घटनेचा व्हिडिओ (video) समोर आला आहे. यात एका हत्तीला (elephant) अतिशय क्रूरपणे मारलं जात (being beaten) आहे. हा व्हिडिओ एका रिज्युविनेशन कॅम्पमधला (rejuvenation camp)आहे. यात दिसतं आहे, की दोन लोक झाडाला बांधलेल्या हत्तीला मारत आहेत.
या व्हिडिओत हत्येच्या पायावर दोन लोक क्रूरपणे लाकडाच्या काठीनं (wooden stick) मारताना दिसत आहेत. दोन्ही आरोपी माहूत असल्याचं सांगण्यात येत आहे. एका व्यक्तीनं या सगळ्या प्रकारचा व्हिडिओ बनवला. हा कॅम्प कोईम्बतूरपासून (Coimbatore) जवळपास 50 किलोमीटर दूर ठेक्कमपट्टी इथं सुरू आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वन्य प्राण्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीच्या मते, हा हत्ती आजारी आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या व्हिडिओमध्ये दिसतं, की माहूत हत्तीला मारत असताना तो वेदनेनं जोरजोरात विव्हळतो आहे. हा हत्ती श्रीविल्लथुपूर मंदिराचा असल्याचं सांगितलं जातं आहे.
Video surfaces of two mahouts attacking an #elephant at the #Thekkampatti rejuvenation camp for temple and mutt elephants in #Coimbatore. HR&CE Department to conduct an inquiry into the incident. @THChennai @OfficeofminSSR pic.twitter.com/sajTFOEmR6
— R. Akileish (@Akileish) February 21, 2021
48 दिवसांचा हा कॅम्प हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एंडोसमेंट्स या संस्थेकडून आयोजित केला जातो. दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या शिबिरात हत्तीची खास देखभाल केली जाते. ते आजारी असतील तर विशेष उपचार दिले जातात. त्यांना पौष्टिक खाद्यही दिलं जातं. यावेळी मात्र हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हेही वाचाहत्तीनं उंटासाठी असं काही केलं की, VIDEO पाहून म्हणाल वाह 'ही खरी मैत्री'!
या प्रकाराबाबत संस्थेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, की हा व्हिडिओ पाहून आम्ही एका माहुताला सस्पेंड केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tamil nadu, Viral video., Wild animal