मराठी बातम्या /बातम्या /देश /दिवसभर चर्चेत असलेल्या गँग रेप VIDEO मधल्या नराधमांना अटक; मंत्र्यांच्या Tweet नंतर देशभरातले पोलीस होते मागे

दिवसभर चर्चेत असलेल्या गँग रेप VIDEO मधल्या नराधमांना अटक; मंत्र्यांच्या Tweet नंतर देशभरातले पोलीस होते मागे

आसाम पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे त्या पाच आरोपींचे फोटो माध्यमांमध्ये शेअर केले. अखेर गुरुवारी रात्री उशिरा चार नराधमांना बंगळुरू पोलिसांनी अटक केलं आहे.

    कोहिमा, 27 मे : गुरुवारी दिवसभर सोशल मीडिया आणि सर्व बातम्यांमध्येही एका लज्जास्पद Video ची चर्चा होती. माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघड झाला. एका महिलेवर गँग रेप होत असतानाचा तो Video होता. सुरुवातीला तो जोधपूरचा असल्याचं सांगितलं गेलं, पण केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी या घृणास्पद प्रकाराची दखल घेत तातडीने सर्व राज्यांच्या पोलिसांनी हे कुठलं प्रकरण आहे याची शहानिशा करायला सांगितलं.

    रिजीजू यांचं Tweet सुद्धा व्हायरल झालं. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी स्पष्ट केलं की, 'ईशान्येकडील मुलीवर 4 पुरुष आणि एका महिलेने बलात्कार आणि अत्याचार केल्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ जोधपूर आत्महत्या प्रकरणाशी संबंधित नाही आहे. मी याप्रकरणी जोधपूरच्या पोलीस कमिशनरांशी बातचीत केली.'

    आसाम पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे त्या पाच आरोपींचे फोटो माध्यमांमध्ये शेअर केले. अखेर गुरुवारी रात्री उशिरा चार नराधमांना बंगळुरू पोलिसांनी अटक केलं आहे.

    काय आहे जोधपूर आत्महत्या प्रकरण?

    काही दिवसांपूर्वी जोधपूरमध्ये आत्महत्येची घटना घडली होती. 23 मे रोजी दिमापूरमधील एका 25 वर्षी नागा महिलेने आत्महत्या केली होती. राजस्थानमधील जोधपूर याठिकाणी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती जोधपूरमध्ये ज्याठिकाणी भाड्याच्या घरात राहत होती, तिथे तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

    हे वाचा-वंशाचा दिवा नाही तर हवी होती मुलगी, रागाच्या भरात चिमुकल्याची दगडावर आपटून हत्या

    त्या दरम्यान एका मुलीवर अत्याचार आणि बलात्कार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो या जोधपूरमधील घटनेशी संबंधित असल्याचं सांगत व्हायरल झाला होता. त्यानंतर याप्रकरणी चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलं.

    दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि विशेष आयुक्त रॉबिन हिबू आयपीएस यांनी मृताच्या बहिणीने आणि पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हीडिओची पडताळणी केल्याची माहिती दिली. त्यावेळी असं समोर आलं आहे की व्हायरल व्हिडीओतील महिला ही जोधपूमध्ये मरण पावलेली महिला नाही आहे.

    First published:
    top videos

      Tags: Gang Rape, Viral video.