नवी दिल्ली, 9 जुलै : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची संख्या वाढत असताना त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. देशात अनलॉक सुरू झाला असला तरी अद्यापही अनेक ठिकाणी काम सुरळीत झालेले नाही. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 10 जुलै रोजी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मध्य प्रदेशात उभारलेल्या रीवा अल्ट्रा मेगा सौर प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान देशाला समर्पित करणारी ही आशियातील सर्वात मोठी सौर परियोजना आहे. 750 मेगावॅट क्षमतेचा आशिया खंडातील हा सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी लिहिले की- उद्या सकाळी 11 वाजता मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील रीवा येथे 750 मेगावॅट सौर प्रकल्पाचे उद्घाटन करेन. हा प्रकल्प 2022 पर्यंत नूतनीकरणक्षम उर्जा क्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. या ट्विटमधील माहिती व्यतिरिक्त पंतप्रधानांनी एक लेखही शेअर केला ज्यात या प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती देण्यात आली आहे.
At 11 AM tomorrow, I would be inaugurating a 750 MW Solar Project in Rewa, Madhya Pradesh via video conferencing. This project adds momentum to our commitment of increasing renewable energy capacities by 2022. https://t.co/sKDdEnSQXc
— Narendra Modi (@narendramodi) July 9, 2020
या प्रकल्पातील सौर पार्कातील ( एकूण क्षेत्रफळ 1500 हेक्टर) 500 हेक्टर जमिनीवर 250 मेगावॅटचे तीन सौर उत्पादन करणाऱ्या युनिटचा समावेश आहे. सौर पार्कात मध्य प्रदेश एनर्जेटिक कॉर्पोरेशन लिमिटेड (एमपीयूव्हीएन) आणि केंद्रीय सौर ऊर्जा महामंडळ (एसईसीआय) या संयुक्तपणे विकसित करण्यात आला आहे. हे वाचा- भारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी! लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO उद्यानाच्या विकासासाठी आरयूएमएसएलला केंद्रीय वित्तीय सहायतासाठी 138 कोटी रुपये केंद्रीय अर्थसहाय्य म्हणून देण्यात आले आहेत.