जाहिरात
मराठी बातम्या / देश / WHO प्रमुखांचं 'केम छो' ऐकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना करून टाकलं 'तुलसीभाई', पाहा VIDEO

WHO प्रमुखांचं 'केम छो' ऐकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना करून टाकलं 'तुलसीभाई', पाहा VIDEO

WHO प्रमुखांचं 'केम छो' ऐकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना करून टाकलं 'तुलसीभाई', पाहा VIDEO

गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये सुरू असलेल्या आयुष परिषदेत पंतप्रधान मोदी, WHO चे प्रमुख Dr Tedros Adhanom Ghebreyesus यांच्याशिवाय मॉरिशसचे पंतप्रधानही उपस्थित होते.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    गांधीनगर, 20 एप्रिल: आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi innoavating Ayush) यांची असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांत ते स्वतः याबाबत  उल्लेख करत असतात. आजही गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये सुरू असलेल्या आयुष परिषदेत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख WHO  ग्लोबल आयुष इन्व्हेस्टमेंट अँड इनोव्हेशन समिट (Global AYUSH Investment and Innovation Summit) या तीन दिवसांच्या परिषदेचं उद्घाटन आज (20 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. त्या वेळी जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्येयिसस (WHO director general Dr Tedros Adhanom Ghebreyesus ) यांच्याशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख मोदींनी केला. एवढंच नाही, तर त्यांना आपण एक भारतीय नावही ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ. टेड्रोस आणि मोदींसह या कार्यक्रमाला मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ आणि केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. टेड्रोस यांनी या वेळी भाषणाची सुरुवात ‘नमस्कार’ असं म्हणून केली. एवढंच नाही तर काही ओळी गुजराती भाषेतून उच्चारल्या. ‘महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर आल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजत आहे,’ असं डॉ. टेड्रोस म्हणाले.

    जाहिरात

    यानंतर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं, तेव्हा त्यांनी थोडी फिरकी घेतली. ते म्हणाले, ‘WHO चे महासंचालक डॉ. टेड्रोस माझे खूप चांगले मित्र आहेत. ते मला सांगत होते, की त्यांनी भारतीय शिक्षकाकडून शिक्षण घेतलं आहे. आज ते म्हणाले, की ‘मी पूर्ण गुजराती झालो आहे. मला एखादं गुजराती नाव ठेवा. म्हणून मी आजपासून माझ्या या मित्राचं नाव तुलसीभाई (Tulsi Bhai) असं ठेवतो आहे.’

    बातम्या - राज्यात अराजकता माजण्याची भीती, गृहमंत्र्यांच्या बैठकांवर बैठका, विरोधकांसोबतही करणार बातचित

     त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तुळशीच्या वैद्यकीय आणि अन्य गुणधर्मांबद्दलही माहिती दिली. अंगणात तुळस लावून तिची पूजा करण्याची पद्धत भारतात आहे, हेही मोदींनी सांगितलं. भारताच्या धार्मिक आणि वैद्यकीय वारशात तुळशीचं महात्म्य मोठं आहे, असं पंतप्रधान म्हणाल्याचं ‘एबीपी लाइव्ह’च्या वृत्तात म्हटलं आहे. डॉ. टेड्रॉस यांनी गुजराती बोलण्यासाठी कष्ट घेतले आहेत, असं सांगून त्यांना तुलसीभाई या नावाने संबोधण्यात आपल्याला आनंद वाटतो, असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

    आयुष विभागात गुंतवणुकीसाठी (Investment) प्रथमच अशी परिषद घेतली जात आहे, असं मोदी म्हणाले. ‘कोविड 19चा प्रकोप सुरू झाला, तेव्हा मी याबद्दल विचार केला होता. त्या काळात आयुष काढा आणि त्या पद्धतीच्या अन्य उत्पादनांनी नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मोठा हातभार लावला होता. या वर्षी आतापर्यंत 14 स्टार्टअप कंपन्या युनिकॉर्न क्लबमध्ये समाविष्ट झाल्या आहेत. लवकरच आयुष क्षेत्रातही युनिकॉर्न स्टार्ट-अप्स तयार होतील. 2014मध्ये आयुष क्षेत्राची उलाढाल 3 अब्ज डॉलर्सची होती. ती आता 18 अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे,’ असं पंतप्रधानांनी नमूद केलं.

    बातम्या - Corona Virus Updates: राजधानी दिल्लीत Corona चे निर्बंध पुन्हा लागू, नियमांचं उल्लंघन केल्यास खिशाला बसेल कात्री

     ‘औषधी वनस्पतींची (Medicinal Plants) लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठेशी सुलभपणे जोडलं जाण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार आयुष ई-मार्केटप्लेसचं आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणावर काम करत आहे. लवकरच एक विशेष आयुष चिन्ह तयार केलं जाणार आहे. हे चिन्ह दर्जेदार आयुष उत्पादनांवर असेल आणि त्यांच्या गुणवत्तेची खात्री देईल,’ असं मोदींनी सांगितलं. आयुर्वेदिक, पारंपरिक उपचारांसाठी भारतात येणाऱ्यांसाठी लवकरच व्हिसाची आयुष श्रेणी सुरू केली जाणार असल्याची घोषणाही मोदींनी केली.

    गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले, ‘पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे योग आणि भारतीय पारंपरिक औषध पद्धतीला जागतिक पातळीवर स्थान मिळालं आहे. जगभरातल्या व्यक्ती आता पारंपरिक चिकित्सा पद्धतीकडे वळत आहेत.’ ‘भारत म्हणजे जगाचं औषधालय आहे. कोविड काळात आम्हाला आयुर्वेदिक औषधं पाठवल्याबद्दल आम्ही भारताचे आभारी आहोत. मॉरिशसमध्ये आयुष लोकप्रिय आहे. पारंपरिक औषधं आधुनिक औषधांना पूरक आहेत, असं आम्ही मानतो,’ असं मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी सांगितलं. ही आयुष परिषद तीन दिवस चालणार आहे. पारंपरिक चिकित्सा व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपाययोजनांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. चांगली गुंतवणूक आकर्षित करून भारत हे ग्लोबल आयुष केंद्र बनविणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या परिषेदत 90 प्रसिद्ध व्याख्याते उपस्थित असतील. तसंच 100 प्रेझेंटेशन्स होतील. पाच पूर्ण सत्रं, 8 गोलमेज परिषदा, 6 कार्यशाळा आणि 2 अन्य कार्यक्रम होतील. यातून आयुष स्टार्टअप्सना प्रोत्साहन मिळेल. गुंतवणुकीला चालना मिळेल. उद्योग जगतातल्या प्रसिद्ध व्यक्ती, तज्ज्ञ आणि विद्वान या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम या परिषदेमुळे होणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात